Guinness World Records: एकाच कंपनीत तब्बल 84 वर्षे नोकरी; Walter Orthmann यांच्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये नोंद

ही निवृत्ती घेण्याचे वयही ठरलेले असते. असे असले तरी काही लोक मात्र ज्या पद्धीतने नोकरी करतात ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. वॉल्टर ऑर्थमन (Walter Orthmann) नावाच्या एका व्यक्तीने अशीच आचाट कामगिरी केली आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स (Guinness World Records) मध्येही करण्यात आली आहे.

Walter Orthmann | (Photo Credit: YouTube)

नोकरी (Job) म्हटले की निवृत्ती ही आली. ही निवृत्ती घेण्याचे वयही ठरलेले असते. असे असले तरी काही लोक मात्र ज्या पद्धीतने नोकरी करतात ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. वॉल्टर ऑर्थमन (Walter Orthmann) नावाच्या एका व्यक्तीने अशीच आचाट कामगिरी केली आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स (Guinness World Records) मध्येही करण्यात आली आहे. होय, या पठ्ठ्याने चक्क एकाच कंपनीत 84 वर्षे काम केले आहे. दररोज एकच काम करुन कंटाळलेल्या मंडळींसाठी हे वृत्त काहीसे धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे.

एकाच कंपनीत सलग 84 वर्षे काम करणारे वॉल्टर ऑर्थमन हे सध्या 100 वर्षांचे आहेत. ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिले आहे.या वृत्तानुसार, गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड लिमिटेड ने घोषणा केली आहेकी, ब्राझीलमधील एका कंपनीत काम करणाऱ्या एका सेल्स मॅनेजरच्या नावावर एकाच कंपनीत सर्वाधिक काळ नोकरी केल्याचा विक्रम आहे. जानेवारी महिन्यात प्राप्त झालेल्या या माहितीची खात्री करुन घेतल्यावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याबाबत माहिती दिली. वॉल्टर एका टेक्सटाईल कंपनीत पाठिमागील 80 वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. 100 वर्षांचे वॉर्टल यांनी इंडस्ट्रियाज रीनॉक्स एसएमध्ये एक शिपींग असिस्टंट म्हणून काम सुरु केले. दरम्यानच्या काळात कंपनीने नाव बदलून रीनॉक्सव्यू (RenauxView) असेही करण्यात आले. (हेही वाचा, China: रूग्णालयात मृत घोषित केलेली व्यक्ती शवागारात जिवंत आढळली; Shanghai मधील धक्कादायक प्रकार)

व्हिडिओ

वॉर्टल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या एक वर्ष आगोदर नोकरी सुरु केली. त्या वेळी ते केवळ 15 वर्षांचे होते. लवकरच त्यांना सेल्स विभागाने वरिष्ठ हुद्द्यावर प्रमोट केले. तेव्हापासून आजपर्यंत ते एकाच पदावर काम करत आहेत. अमेरिकेच्या ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिक्सने 2020 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकी कर्मचारी सरासरी 4.1 वर्षे नोकरीत टिकतात. त्यामुळे ऑर्थमन यांनी केलेले काम खरोखरच आश्चर्यकारक मानले जात आहे.