Goldy Brar Death: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या; कॅलिफोर्नियामध्ये प्रतिस्पर्धी टोळीने घातल्या गोळ्या- Reports

गोल्डीने 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मूसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले होते. गोल्डीने वैयक्तिकरित्या ही हत्या केल्याची कबुली दिली होती. मूसेवाला हत्याकांडानंतर गोल्डीला दहशतवादी घोषित करण्यात आले होते.

Goldy Brar Death: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या; कॅलिफोर्नियामध्ये प्रतिस्पर्धी टोळीने घातल्या गोळ्या- Reports
Goldy Brar and Sidhu Moose Wala (Image source: Twitter)

Goldy Brar Death: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर गोल्डी ब्रारची (Gangster Goldy Brar) हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स गँगचा सर्वात महत्त्वाचा कार्यकर्ता असलेल्या गोल्डीची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या हत्येची जबाबदारी त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीच्या डल्ला-लखबीरने (Dalla-Lakhbir Gang) घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

सोशल मिडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, मात्र याबाबत अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही. गोल्डी ब्रार हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांना तसेच इतर राज्यांच्या पोलिसांना हवा होता. काही काळापूर्वी गोल्डीला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले होते.

पहा पोस्ट- 

गोल्डीने 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मूसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले होते. गोल्डीने वैयक्तिकरित्या ही हत्या केल्याची कबुली दिली होती. मूसेवाला हत्याकांडानंतर गोल्डीला दहशतवादी घोषित करण्यात आले होते. सतींदरजीत सिंग किंवा गोल्डी ब्रार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सतविंदर सिंगचा बाबर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि तो अनेक हत्या, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अतिरेकी कारवायांमध्येही सामील होता, असे गृह मंत्रालयाने म्हटले होते. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत होते. (हेही वाचा: London Mass Stabbing Videos: लंडन हादरले! दिवसाढवळ्या व्यक्तीचा तलवारीने सामान्य लोक आणि पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल)

गोल्डी ब्रार जन्म 1994 साली पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात झाला. त्याच्या वडिलांनी यापूर्वी पंजाब पोलिसात सेवा बजावली होती. 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर, गोल्डी ब्रार प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करणे आणि श्रीमंत व्यक्तींकडून पैसे उकळणे यासारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील झाला. मे 2023 मध्ये, गोल्डी बार कॅनडातील मोस्ट वॉन्टेड व्यक्तींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर होता. खून, कट रचणे, बेकायदेशीर बंदुकीचा व्यापार आणि खुनाचा प्रयत्न या आरोपांमुळे त्याला यादीत समाविष्ट करण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us