UAE Lifetime Golden Visa Fake News Alert: भारतीयांना अवघ्या 23 लाखांमध्ये यूएई चा गोल्डन व्हिसा मिळणार असल्याचे वायरल वृत्त खोटे; प्रशासकीय यंत्रणांनी फेटाळला वायरल दावा

आयसीपीने जनतेला फसव्या योजना, आवाहनांना बळी पडू नये आणि व्हिसा-संबंधित माहितीसाठी केवळ व्हेरिफाईड अकाऊंट्स वर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.

UAE Flag. (Photo Credits: Twitter)

United Arab Emirates ने भारतीयांसाठी लाईफटाईम गोल्डन व्हिसा देण्याबाबतच्या सध्या वायरल होत असलेल्या अफवा आणि वृत्तांचे खंडन केले आहे. Abu Dhabi's federal authority for Identity, Citizenship, Customs and Port Security ने "काही विशिष्ट राष्ट्रीयत्वांसाठी" लाईफटाईम गोल्डन व्हिसा च्या या अफवांचे खंडन केले आहे. युएईच्या आयसीपीने सांगितले की गोल्डन व्हिसा अर्ज केवळ सरकारी माध्यमांद्वारे हाताळले जातात.

"अर्ज प्रक्रियेत कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य सल्लागार संस्थेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली जात नाही," असे आयसीपीने स्पष्ट केले आहे. Emirates News Agency ने शेअर केलेल्या निवेदनात असेही जारी करण्यात आले आहे की, यूएईमध्ये स्थायिक होण्यासाठी लाईफटाईम गोल्डन व्हिसाबद्दल परदेशी माध्यमांमधून काही अहवाल आणि अफवा पसरवण्यात आल्यानंतर आयसीपीने हा नकार दिला आहे. Indian Driver Won Lottery In UAE: छप्पर फाड के! भारतीय चालकास UAE मध्ये तब्बल 33 कोटींची लॉटरी.  

इथे पहा माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by الهوية والجنسية والجمارك وأمن المنافذ | UAEICP (@uaeicp)

आठवड्याच्या सुरुवातीला, असे वृत्त आले होते की भारत आणि बांगलादेशमधील नागरिक फक्त 23 लाख रूपयांमध्ये लाईफटाईम गोल्डन व्हिसासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. पण UAE federal authority ने हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. यूएईमध्ये राहण्यासाठी आणि वास्तव्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करण्याच्या प्रयत्नात खोटी माहिती पसरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयसीपीने पुढे म्हटले आहे.

आयसीपीने जनतेला फसव्या योजना, आवाहनांना बळी पडू नये आणि व्हिसा-संबंधित माहितीसाठी केवळ व्हेरिफाईड अकाऊंट्स वर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे. योग्य मार्गदर्शनासाठी, अर्जदार www.icp.gov.ae ला भेट देऊ शकतात किंवा 600522222 या क्रमांकावर कॉल करू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement