Global COVID-19 Update: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.1 कोटीच्या पार तर 5.2 लाखांहून अधिक मृतांची नोंद

कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील बहुतांश देशांना ग्रासले आहे. कोविड-19 वर अद्याप ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील बहुतांश देशांना ग्रासले आहे. कोविड-19 (Covid-19) वर अद्याप ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजही त्यात भर पडली असून जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1.1 कोटींवर पोहचला आहे. तर एकूण 524000 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, शनिवारी (4 जुलै) सकाळपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 11,047,217 इतकी होती. तर मृतांचा आकडा 524,614 इतका प्रचंड आहे. (Coronavirus in India: मागील 24 तासांत 22,771 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 648315 वर)

CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस बाधितांच्या संख्येत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेतील 2,793,425 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 129,432 इतका आहे. तर ब्राझीलमध्ये 1,539,081 कोरोनाग्रस्त रुग्ण असून 61,884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 2,793,425
ब्राझील 1,539,081
रशिया 666,941
भारत 625,544
पेरू 295,599
चिली 288,089
ब्रिटेन 285,787
स्पेन 250,545
मेक्सिको 245,251
इटली 241,184
इराण 235,429
पाकिस्तान 221,896
फ्रान्स 204,222
तुर्की 203,456
सौदी अरेबिया 201,801
जर्मनी 196,780
दक्षिण अफ्रीका 177,124
बांग्लादेश 156,391
कॅनडा 106,962
कोलम्बिया 106,392

तर 10,000 हून अधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्रिटन (44,216), इटली (34,833), फ्रान्स (29,896), मेक्सिको (29,843), स्पेन (28,385), भारत (18,213), इराण (11,606) आणि पेरु (10,226)  या देशांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now