Global COVID-19 Update: जगभरात कोरोना संसर्गामुळे तब्बल 6 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू; पहा COVID19 च्या रुग्णसंख्येनुसार देशांची क्रमवारी

कोरोना विषाणूंच्या विळख्यात अडलेले अनेक देशांना औषध किंवा लसीअभावी या संकटावर मात करावी लागत आहे. पहा कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी...

Coronavirus (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसच्या जागितक आरोग्य संकटाने जगभरातील अनेक देशांना ग्रासले आहे. कोरोना विषाणूंच्या विळख्यात अडलेले अनेक देशांना औषध किंवा लसीअभावी या संकटावर मात करावी लागत आहे. दरम्यान जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 1.42 कोटींच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 601,000 हून अधिक झाला आहे. युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्स (University's Center for Systems Science and Engineering) यांच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, रविवार (19 जुलै) पर्यंत जगभरात एकूण 14,231,248 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 601,213 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

CSSE च्या आकडेवारीनुसार, कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या अमेरिकत एकूण 3,707,023 कोरोनाग्रस्त असून 140,105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझील मध्ये 2,074,860 कोरोना बाधित रुग्ण असून 78,772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार गेला असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येनुसार जगभरातील देशांची क्रमवारी:

अमेरिका 3,707,023
ब्राझील 2,074,860
भारत 1077618
रशिया 764,215
दक्षिण आफ्रिका 350,879
पेरु 349,500
मेक्सिको 338,913
चिली 328,846
ब्रिटन 295,632
इराण 271,606
पाकिस्तान 261,917
स्पेन 260,255
इटली 243,736
सौदी अरेबिया 248,416
इटली 244,216
तुर्की 218,717
फ्रान्स 211,943
जर्मनी 202,426
बांग्लादेश 202,066
कोलम्बिया 182,140
अर्जेंटीना 122,524
कॅनडा 111,875
कतार 106,308

10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (45,358), मेक्सिको (38,888), इटली (35,042),  फ्रान्स (30,155),  स्पेन (28,420), भारत (26,816), इराण (13,608), पेरु (12,998) आणि रशिया (12,228) यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.