Give Kohinoor Return to India: लाईव्ह टीव्ही शोमध्ये भारतीय वंशाच्या महिला पत्रकार आणि इंग्लंडच्या महिलेत तिखट चर्चा (Watch Video)
या व्हिडिओमध्ये इग्लंडमधील एका प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात लेखिका आणि प्रसारणकर्ता एम्बा वेब आणि भारतीय वंशाची पकार नरिंदर कौर यांच्यात कोहीनूरवरुन चर्चा असल्याचे पाहायला मिळते.
इंग्लंडच्या राणीच्या निधनानंतर तिथे राजा चार्ल्स के राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, सांगितले जात आहे की, या वेळी महाराणी व्हिकिटोरियाचा कोहीनूर (Kohinoor) लावलेला मुकूट या वेळी वापरला जाणार नाही. त्यामुळे असीशीही चर्चा आहे की, कोहीनूर (Give Kohinoor Return to India) भारताला परत करण्याचा विचार इंग्लंडकरते आहे की काय. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये इग्लंडमधील एका प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात लेखिका आणि प्रसारणकर्ता एम्बा वेब आणि भारतीय वंशाची पकार नरिंदर कौर यांच्यात कोहीनूरवरुन चर्चा असल्याचे पाहायला मिळते.
एम्म वेब हिने दावा केला की कोहीनूर हिऱ्याच्या मालकी हक्कावरुन वाद आहे. ज्यावर नरिंदर कौर यांनी म्हटले की तुम्हाला इतिहासाबद्दल माहिती नाही. एम्मा वेब हिने म्हटले की, शिक साम्राज्याचे लाहोरवरही सत्ता होती. तेव्हा पाकिस्तानही यावर दावा करणार का? एम्मा यांनी म्हटले की, शिख साम्राज्याने कोहीनुर हिरा ईरानी साम्राज्याकडून चोरला होता आणि इरानी साम्राज्याने मुगल शासकांच्या आक्रमण करुन तो बळकावला होता. त्यामुळे कोहिनूरच्या मालकीवरुन वाद आहेत. (हेही वाचा, Kohinoor: कोहिनूर लवकरचं भारतात परत आणला जाणार? भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रीया)
व्हिडिओ
एम्मा वेब यांच्या वक्तव्यावर भारतीय वंशाच्या नरिंदर कौर म्हणाल्या की, 'कोहिनूर हिरा वसाहतवादी काळ आणि हत्यांचे प्रतिनिधित्व करतो. तो भारताला परत दिले पाहिजे. भारतीय वारशाने कोहिनूर हिरा पाहण्यासाठी इतका प्रवास करून ब्रिटनला यावे, असे मला वाटत नाही.' नरिंदर कौर यांनीही नंतर ट्विट केले, ज्यात तिने लिहिले की, 'कोहिनूर हिरा भारताच्या भूमीतून आला आहे. हे ब्रिटनचा काळा अध्याय आणि वसाहतवादी इतिहास प्रतिबिंबित करतो. वसाहतवादी भूतकाळातील शोषण थांबले पाहिजे. युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की आपल्या खजिन्यावर पुन्हा दावा करणे हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे.'