अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष George Herbert Walker Bush यांचे अमेरिकेमध्ये निधन

या आजाराशी सामना करताना त्यांचे निधन झाले.

George Bush Senior (Photo credit : ANI)

George Herbert Walker Bush Death : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष   George Herbert Walker Bush यांचे अमेरिकेमध्ये निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 30 नोव्हेंबर रोजी Houston Methodist Hospital मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. बुश यांच्या रक्तामध्ये इन्फेक्शन पसरले होते. या आजाराशी सामना करताना त्यांचे निधन झाले. George Bush Senior यांच्या पश्चात 5 मुलं, त्यांचे साथीदार, 17 नातवंडं असा परिवार आहे.

12 जून 1924 दिवशी बुश यांचा जन्म झाला होता. 1989 - 1993 काळात अमेरिकेचे ते 41वे राष्ट्राध्यक्ष  होते. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी बुश 1981 - 1989 पर्यंत अमेरिकेचे 43 वे वाइस प्रेसिडेंट होते बुश यांच्या पत्नी बारबरा यांचा मृत्यु 17 एप्रिल 2018  ला झाला. त्यांचा 73 वर्षांचा संसार अमेरिकेतील इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षच्या तुलनेत अधिक काळ टिकलेला आहे. बारबरा यांच्या मृत्युनंतर काही दिवसातच बुश यांच्या रक्तातील इन्फेक्शनचा निदान झालं.