Bangladesh General Elections 2026: बांगलादेशात पुढील वर्षी होणार सार्वत्रिक निवडणुका; मुहम्मद युनूस यांची मोठी घोषणा

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी शुक्रवारी घोषणा केली आहे की, देशातील बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रीय निवडणुका 2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात होतील.

Bangladesh General Elections 2026: बांगलादेशात पुढील वर्षी होणार सार्वत्रिक निवडणुका; मुहम्मद युनूस यांची मोठी घोषणा
Muhammad Yunus (फोटो सौजन्य - X/@ToolsTech4All)

Bangladesh General Elections 2026: गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. शेख हसीनाच्या सत्तापालटानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. तथापि, काही काळानंतर बांगलादेशातील जनता, तेथील राजकीय पक्ष आणि लष्करही मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर नाराज झाले आहेत. आता जनतेने लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. अखेर मोहम्मद युनूस यांनी या मागणीपुढे मान झुकवली आहे. मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची (Bangladesh General Elections 2025) घोषणा केली आहे.

2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात होणार निवडणूका -

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी शुक्रवारी घोषणा केली आहे की, देशातील बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रीय निवडणुका 2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात होतील. मुहम्मद युनूस म्हणाले, 'मी देशातील नागरिकांना सांगत आहे की एप्रिल 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात कोणत्याही दिवशी निवडणूक होईल.'

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा - 

दरम्यान, गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये खूप हिंसक निदर्शने झाली होती. यानंतर, ऑगस्ट महिन्यात, पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार एका राजकीय बंडात उलथवून टाकण्यात आले. त्यानंतर शेख हसीना भारतात आल्या. तेव्हापासून त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. या संपूर्ण बंडानंतर बांगलादेशमध्ये ही पहिलीच निवडणूक होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).