PNB Scam चा आरोपी नीरव मोदी'ला 24 मे पर्यंत कोठडी कायम; Westminster Magistrates' कोर्टाने पुन्हा नाकारला जामीन
त्याची पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या (Punjab National Bank) घोटाळ्याचे आरोप असलेल्या नीरव मोदीला (Nirav Modi) लंडनमध्ये अटक झाल्यानंतर आता जामीन पुन्हा नाकरण्यात आला आहे. लंडन येथील वेस्टमिन्सटर कोर्टाने (Westminster Magistrates' Court) नीरव मोदीचा जामीन नाकरला आहे. त्याची पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे. PNB Scam Case: नीरव मोदी स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? घ्या जाणून
ANI ट्विट
भारतामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये घोटाळ्याचे आरोप असलेला नीरव मोदी पळ काढून लंडनला गेला होता. लंडनमध्ये ऐशोआरामात राहत असणार्या नीरव मोदीच्या अटक आणि प्रत्यार्पणासाठी भारत सरकार, ईडीचे काही कर्मचारी तेथे पोहचले. त्यानंतर नीरव मोदीला 20 मार्चला अटक करण्यात आली. अटकेनंतर नीरव मोदीला लंडनच्या वॅंड्सवर्थ कारागृहामध्ये ठेवण्यात आलं आहे.