अमेरिकी सैन्य तैनात असलेल्या इराकच्या तळावर चार रॉकेट घुसले; रिपोर्ट्स
US-Iran Conflict: बगदादच्या उत्तरेस अमेरिकन सैन्य राहत असलेल्या इराकी एअरबेसवर चार रॉकेट्स घुसले आहेत अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी रविवारी एएफपीला दिली.
US-Iran Conflict: बगदादच्या उत्तरेस अमेरिकन सैन्य राहत असलेल्या इराकी एअरबेसवर चार रॉकेट्स घुसले आहेत अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी रविवारी एएफपीला दिली. सुरक्षा दलांनी सांगितले की, चार इराकी हवाई सैनिक यात जखमी झाले आहेत.
सैन्याच्या सुत्रांनी सांगितले की, मॉर्टर बॉम्ब बेसच्या धावपट्टीवर आत गेला, जो बगदादच्या उत्तरेस 80 किमी अंतरावर आहे. बालाड हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात किमान चार इराकी सैनिक जखमी झाले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिका आणि इराणमधील तणावानंतर, बगदादच्या उत्तरेकडील अल-बालाड एअरबेसवर तैनात असलेले बहुतेक अमेरिकन हवाई दल आधीच निघून गेले होते, असे सैन्य सूत्रांनी सांगितले.
अमेरिकन सैन्य तैनात असलेल्या सैन्य तळांवर अलिकडच्या काही महिन्यांत रॉकेट आणि तोफ हल्ले होत आहेत. त्यात बहुतांश इराकी सैन्यच जखमी झाले आहे. परंतु, गेल्या महिन्यात एका अमेरिकन कंत्राटदाराचा देखील यात बळी घेतला गेला आहे.
युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराणी लष्कराकडून मोठा खुलासा
दरम्यान, अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील वाद अधिक चिघळत चालला असून हे दोन्ही देश एकमेकांना हल्ल्याच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत आहेत. प्रतिउत्तराचे हे सत्र सुरू असतानाच मागील आठवड्यात इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला होता. याचा अर्थ इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचा हा संकेत असल्याचे म्हटलं जात आहे.