China's ex-Foreign Minister Qin Gang Dead: चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे निधन; आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याचा रिपोर्टमध्ये दावा

किन गँग यांचा आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. या वर्षी जुलैमध्ये किन यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले होते. त्याच्यावर हेरगिरीचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.

China's ex-Foreign Minister Qin Gang (PC - X/@Reuters)

China's ex-Foreign Minister Qin Gang Dead: चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग (China's ex-Foreign Minister Qin Gang) यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका अहवालात असे म्हटले आहे की, किन गँग (Qin Gang) यांच्या मृत्यूचा संशय वाढवत आहे. किन गँग यांचा आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. या वर्षी जुलैमध्ये किन यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले होते. त्याच्यावर हेरगिरीचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.

पॉलिटिकोच्या अहवालानुसार, चीनच्या उच्च अधिकार्‍यांपर्यंत पोहोचलेल्या दोन लोकांनी दावा केला आहे की, किन गँगचा जुलैच्या अखेरीस बीजिंगमधील लष्करी रुग्णालयात मृत्यू झाला होता. देशातील आघाडीच्या नेत्यांवर या रुग्णालयात उपचार चालू होते. (हेही वाचा -BBC New Chairman: औरंगाबाद मध्ये जन्मलेले भारतीय वंशाचे Dr Samir Shah बनणार बीबीसी चे नवे चेअरमन!)

याआधी वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले होते की, किनचे अमेरिकेत राजदूत असताना दुसऱ्या महिलेशी संबंध होते. माजी परराष्ट्रमंत्र्यांवर चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोपही त्यात नमूद करण्यात आला आहे.

तथापी, अहवालात म्हटले आहे की कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत तपासणीत असे आढळून आले आहे की युनायटेड स्टेट्समध्ये चीनचे राजदूत असताना किन गँग या प्रकरणामध्ये गुंतलेले होते. किन गँग यांचे लग्न झालेले असूनही त्यांचे अफेअर होते. त्यामुळे त्यांच्या एका मुलाचा जन्म अमेरिकेत झाला. अधिकार्‍यांनी महिला आणि मुलाची नावे सार्वजनिक केलेली नाहीत. (हेही वाचा - Khalistani Terrorist Lakhbir Singh Rode Dies: खलिस्तानी दहशतवादी लखबीरचा पाकिस्तानात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन)

दरम्यान, जून 2023 मध्ये किग गँग अचानक गायब झाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अनुभवी मुत्सद्दी वांग यी यांची नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली. किन गँग हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. जुलै 2021 ते या वर्षी जानेवारी या कालावधीत ते वॉशिंग्टनमध्ये चीनचे सर्वोच्च दूत होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now