Camel Flu Infection in Qatar: कतारमध्ये कोविडपेक्षाही घातक व्हायरसची भीती! फिफा विश्वचषक 2022 चाहत्यांना 'कॅमल फ्लू' संसर्गाचा धोका

न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मार्की इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात मेळाव्यामुळे संभाव्य संसर्गजन्य रोगाचा जलद प्रसार होण्याचा धोका निर्णाण होण्याची शक्यता आहे.

Camel प्रतिकात्मक प्रतिमा (PC - unsplash)

Camel Flu Infection in Qatar: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये 'कॅमल फ्लू' (Camel Flu) किंवा मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) नावाच्या घातक आजाराच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा प्रतिष्ठित कार्यक्रम संपूर्ण जगाला आखाती राष्ट्र कतारकडे आकर्षित करत आहे. न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मार्की इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात मेळाव्यामुळे संभाव्य संसर्गजन्य रोगाचा जलद प्रसार होण्याचा धोका निर्णाण होण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये इतर संभाव्य रोग लेशमॅनियासिस, मलेरिया, डेंग्यू, रेबीज, गोवर, हिपॅटायटीस ए आणि बी आणि ट्रॅव्हलर्स डायरिया आदी रोगांची लागण होण्याची भीती आहे.

सध्या सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 ने सुमारे 1.2 दशलक्ष चाहते आकर्षित केले आहेत. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे शिखर मानली जाते आणि ती जगभरात पाहिली जाते. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, कतार अशा कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे, परंतु प्रेक्षकांनी सतर्क राहणे आणि संसर्गाबद्दल जागृत राहणे महत्त्वाचं ठरणार आहे. (हेही वाचा - Covid 19 Cases in China: चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; कडक निर्बंधातही नवे 40 हजार रूग्ण समोर)

वर नमूद केलेल्या जोखीम कमी करण्यासाठी, स्पर्धांना भेट देणाऱ्यांनी त्यांच्या नियमित लसीकरणासह अद्ययावत असले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या सुरक्षित वापरासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. स्पर्धेसाठी कतारला जाणार्‍या व्यक्तींना उंटांना स्पर्श करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आहे, जे प्राणघातक संसर्गाचे मूळ असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, कतारचा शेजारी देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये 2012 मध्ये MERS चे पहिले प्रकरण समोर आले होते. (हेही वाचा - New Virus in China: वटवाघुळांमध्ये आढळून आला कोविडसारखा आणखी एक धोकादायक BtSY2 विषाणू; पसरला तर होऊ शकतो विनाश)

यूके-आधारित विज्ञान वेबसाइट IFLScience नुसार, गेल्या दशकात 27 वेगवेगळ्या देशांमध्ये कॅमल फ्लूची एकूण 2,600 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात 935 संबंधित मृत्यू आहेत. ताप, श्वास लागणे आणि खोकला यासारखी सौम्य लक्षणे कॅमल प्लू रुग्णांमध्ये आढळतात. FIFA विश्वचषक 2022 च्या गट टप्प्याला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून स्पर्धा 18 डिसेंबर रोजी लॉस एंजेलिस स्टेडियमवर अंतिम फेरीसह समाप्त होणार आहे.