Ex-YouTube CEO Susan Wojcicki Dies: यूट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांचे निधन; वयाच्या 56 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास
त्यांच्या नेतृत्वाखाली YouTube हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बनले. त्याच्या अनुपस्थितीत कुठेतरी मोठी पोकळी जाणवेल. सुसान वोजिकी यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोकसंदेश येत आहेत.
Ex-YouTube CEO Susan Wojcicki Dies: यूट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोजिकी (Susan Wojcicki) यांचे निधन झाले आहे. त्यांचे पती डेनिस ट्रॉपर (Dennis Tropper) यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टमध्ये दुःखद बातमीची पुष्टी दिली आहे. दोन वर्षे कर्करोगाशी (Cancer) झुंज दिल्यानंतर सुसान यांनी या जगाचा निरोप घेतला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी त्यांचे वर्णन करताना सांगितले की, सुसान वोजिकीच्या मृत्यूमुळे मला दु:ख झाले आहे. ती हे जग सोडून गेली. सुझान फक्त सीईओ नव्हती तर एक प्रेरणादायी नेता, प्रेमळ पत्नी आणि दयाळू आई होती. 2014 ते 2023 पर्यंत त्यांनी YouTube चे नेतृत्व केले आणि कंपनीला नवीन उंचीवर नेले. वोजिकी ही Google च्या इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती होती. तिच्याशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे.
सुसान वोजिकी यांच्या निधनामुळे YouTube आणि तंत्रज्ञान जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली YouTube हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बनले. त्याच्या अनुपस्थितीत कुठेतरी मोठी पोकळी जाणवेल. सुसान वोजिकी यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोकसंदेश येत आहेत. लोक त्यांच्या कामगिरीचे स्मरण करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत. (हेही वाचा -New YouTube Guidelines: यूट्यूबची नवी मार्गदर्शक तत्वे, Artificial Intelligence आधारित व्हिडिओंवर असणार बारीक नजर)
सुंदर पिचाई यांची पोस्ट -
एका भावनिक फेसबुक पोस्टमध्ये, वोजिकीचे पती डेनिस ट्रोपर यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीचे वर्णन 'तेजस्वी मन' असे केले. तसेच ती अनेकांची प्रिय मित्र होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. 'सुसान वोजिकी यांच्या निधनाची बातमी मी अत्यंत दु:खाने शेअर करत आहे. 56 वर्षांची माझी लाडकी पत्नी आणि आमच्या पाच मुलांची आई नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कर्करोगाने दोन वर्षे जगल्यानंतर आज आम्हाला सोडून गेली. सुसान ही केवळ माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि जीवनातील जोडीदार नव्हती, तर ती एक तेजस्वी मन, एक प्रेमळ आई आणि अनेकांची प्रिय मित्र होती.' (होही वाचा -YouTube AI-Powered Feature: युट्युबचे AI-पॉवर्ड हमिंग फीचर ओळखणार तुमच्या डोक्यात अडकलेली अन मनात साचलेली गाणी)
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, आमच्या कुटुंबावर आणि जगावर तिचा प्रभाव अतुलनीय होता. आम्ही दु:खी आहोत, परंतु आम्ही तिच्यासोबत घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञ आहोत. कृपया या कठीण काळात आम्ही मार्गक्रमण करत असताना आमच्या कुटुंबाला तुमच्या विचारात ठेवा.