दर 11 मिनिटांनी होत आहे जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्याकडून एका महिलेची किंवा मुलीची हत्या- U.N. Chief Antonio Guterres
युएनचे सरचिटणीस म्हणाले की, स्त्रिया आणि मुलींना ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या द्वेषयुक्त शब्दांपासून लैंगिक छळ, प्रतिमेचा गैरवापर होतो.
जगभरात हत्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. अशात संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस (U.N. Chief Antonio Guterres) यांनी सांगितले की, जगात दर 11 मिनिटांनी एका मुलीची किंवा महिलेची हत्या होत आहे. ही हत्या महिलेच्या किंवा मुलीच्या जवळच्या व्यक्तीने केली आहे. गुटेरेस म्हणाले की, महिलांवरील हिंसाचार हे जगातील सर्वात मोठे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.
या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारांनी राष्ट्रीय स्तरावर कृती योजना राबविण्याची गरज आहे. 25 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या 'महिलांवरील हिंसाचार निर्मूलन' या आंतरराष्ट्रीय दिनापूर्वी गुटेरेस यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले की दर 11 मिनिटांनी एका महिलेची किंवा मुलीची तिच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून हत्या केली जाते. दिल्लीतील श्रद्धा वॉकरच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना अँटोनियो गुटेरेस यांचे वक्तव्य समोर आले आहे.
श्रद्धा खून प्रकरणाचे गूढ उकलण्यामध्ये पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. श्रद्धा घोटाळ्यातील आरोपी आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याला पोलिसांनी अटक केली असली तरी, पोलिसांना अद्याप असा कोणताही पुरावा मिळालेला नाही, ज्यामुळे श्रद्धाच्या हत्येचे रहस्य उलगडू शकेल. (हेही वाचा: श्रद्धाने 2020 मध्ये आफताबविरुद्ध केली होती तक्रार; महाराष्ट्र सरकार करणार चौकशी, Devendra Fadnavis यांची माहिती)
युएनचे सरचिटणीस म्हणाले की, स्त्रिया आणि मुलींना ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या द्वेषयुक्त शब्दांपासून लैंगिक छळ, प्रतिमेचा गैरवापर होतो. अर्ध्या मानवतेला लक्ष्य करणाऱ्या या भेदभाव, हिंसा आणि अत्याचाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ही गोष्ट सर्व क्षेत्रातील महिला आणि मुलींसाठी लागू होते, ज्याद्वारे त्यांचे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहेत.