Elon Musk यांची Bill Gates वर मात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरा क्रमांक

टेस्ला च्या शेअर्समध्ये तेजी असल्याने 49 वर्षीय मस्क यांच्या संपत्तीमध्ये एका दिवसांत 7.2 अरब डॉलर्सची वाढ होऊन ती 127.9 अरब डॉलर्स म्हणजे 9.48 लाख कोटी इतकी झाली आहे.

Elon Musk and Bill Gates (Photo Credits: Wikimedia Commons)

टेस्ला (Tesla Inc.) चे सीईओ आणि सह संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीमध्ये यंदाच्या वर्षात मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये जानेवारी महिन्यात जगातल्या 500 श्रीमंताच्या ब्लूमबर्ग बिलेनयिर्स इंडेक्स मध्ये 35 व्या स्थानी असणार्‍या एलन मस्क यांनी दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. आता त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. श्रीमंतांच्या यादीमध्ये आता त्यांच्यापुढे केवळ अमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस (Jeff Bezos) आहे.

टेस्ला च्या शेअर्समध्ये तेजी असल्याने 49 वर्षीय मस्क यांच्या संपत्तीमध्ये एका दिवसांत 7.2 अरब डॉलर्सची वाढ होऊन ती 127.9 अरब डॉलर्स म्हणजे 9.48 लाख कोटी इतकी झाली आहे. तसेच यंदा मस्कच्या नेटवर्थ मध्ये अंदाजे 10,000 कोटी डॉलर म्हणजे 7.44 लाख कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. हा फायदा इतरांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

एलन मस्क हा साऊथ आफ्रिकन वंशाचा अमेरिकन उद्योगपती आहे. 1999 साली त्याने X.com म्हणजेच आत्ताच्या पे पाल ची स्थापना केली होती. त्यानंतर 2002 साली SpaceX आणि 2003 साली टेस्ला मोटर्सची स्थापना केली आहे. त्याच्या 20 शी अखेरीमध्ये तो मल्टिमिलेनियर झाला. त्यावेळी त्याने त्याची स्टार्ट अप Zip2 ही कंपनी Compaq Computers ला विकली होती. Elon Musk ने उठवले COVID 19 Test निकालांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; एकाच दिवसात त्याच्या 4 टेस्टचे वेगवेगळे रिपोर्ट्स

सध्याच्या घडीला ब्लूमबर्ग बिलेनयिर्स इंडेक्स च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये बेजॉस, मस्क, गेट्स पाठोपाठ चौथ्या स्थानी बेनॉर्ड अर्नाल्ट आणि पाचव्या स्थानी फेसबूकचे मार्क झुकरबर्ग आहेत.