Earthquake in Chile: चिलीमध्ये भूकंप; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे जाणवले हादरे, वीजपुरवठा खंडित
उत्तर चिलीमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे पायाभूत सुविधांचे किरकोळ नुकसान झाले. 20,000 हून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
Earthquake in Chile: शुक्रवारी उत्तर चिलीमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे पायाभूत सुविधांचे किरकोळ नुकसान (Chile Earthquake) झाले. 20,000 हून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने भूकंपानंतर कोणतीही जीवितहानी नोंदवली गेली नाही. अटाकामा वाळवंटातील एका मोठ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. काही दिवसांपूर्वी ग्रीस मध्ये 6 रिश्टल स्केलचा भूकंप झाला होता. तुर्की, लेबनॉन, इजिप्त आणि इस्रायलसारख्या शेजारील देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
Greece Earthquake: ग्रीस मध्ये 6 रिश्टल स्केलचा भूकंप
वीजपुरवठा खंडित
चिलीमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे पायाभूत सुविधांचे किरकोळ नुकसान झाले. त्याशिवाय, 20,000 हून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी कोणतीही जीवितहानी नोंदवलेली नाही.
कोणतीही जीवितहानी नाही
अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षणने अहवालानुसार, भूकंप 76 किलोमीटर खोलीवर झाला. त्याचा केंद्रबिंदू अटाकामा वाळवंटाच्या जवळचा भाग होता. अटाकामा वाळवंटाच्या विस्तीर्ण क्षेत्रातील अनेक प्रदेशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 08:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

