Court Orders Sperm Donor To Stop Donating: जागतिक स्तरावर 550 पेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्या व्यक्तीला डच कोर्टाने दिला वीर्य दान न करण्याचा आदेश; काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या
नेदरलँड्स (Netherlands) मधील न्यायालयाने 2007 पासून 550 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्याचा आरोप केल्यानंतर एका पुरुषाला त्याचे वीर्य दान (Sperm Donor) करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नेदरलँड्स आणि मोठ्या युरोपीय प्रदेशाला हादरवून सोडणारा प्रजनन घोटाळा (Fertility Scam) उघडकीस आला आहे.
Court Orders Sperm Donor To Stop Donating: नेदरलँड्स (Netherlands) मधील न्यायालयाने 2007 पासून 550 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्याचा आरोप केल्यानंतर एका पुरुषाला त्याचे वीर्य दान (Sperm Donor) करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नेदरलँड्स आणि मोठ्या युरोपीय प्रदेशाला हादरवून सोडणारा प्रजनन घोटाळा (Fertility Scam) उघडकीस आला आहे. जोनाथन एम. असं या व्यक्तीचं नाव आहे. न्यायालयाने अनेक देशांमध्ये शेकडो सावत्र भावंडांसह जोनाथनच्या नेतृत्वाखाली विशाल नातेसंबंध नेटवर्क समोर आणले आहे.
नेदरलँड्समधील क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वानुसार, दात्याने 12 कुटुंबांमध्ये 25 पेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ नये. तथापि, न्यायाधीशांना असे आढळून आले की पुरुषाने 2007 मध्ये शुक्राणू दान करण्यास सुरुवात केल्यापासून 550 ते 600 मुलांना जन्म दिला. (हेही वाचा - Oral Sex मुळे उद्भवू शकतो घशाच्या कॅन्सर; डॉक्टरांनी दिला इशारा)
दरम्यान, न्यायालयाने प्रतिवादीला त्याचे वीर्य नवीन भावी पालकांना दान करण्यास मनाई केली आहे, असं न्यायाधीश थेरा हेसेलिंक यांनी सांगितले. जोनाथन एम यांना कोणत्याही भावी पालकांशी संपर्क न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापी, न्यायालयाने जोनाथनला चेतावणी दिली की, जर त्याने त्याचे वीर्य दान करणे सुरू ठेवले तर त्याला भविष्यातील प्रत्येक वीर्यासाठी 90 कोटींहून अधिक दंड भरावा लागेल.
द गार्डियनमधील एका अहवालानुसार, जोनाथन एम यांनी जन्मलेल्या 100 हून अधिक मुलांचा जन्म नेदरलँडमध्ये झाला. पण एका क्लिनिकने त्याचे वीर्य विविध देशांतील इतर खासगी पत्त्यांवरही पाठवले. हेगमधील जिल्हा न्यायालयाने सांगितले की, दात्याने भूतकाळात आधीच जन्मलेल्या मुलांच्या संख्येबद्दल संभाव्य पालकांना जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली.
या सर्व पालकांना आता या वस्तुस्थितीचा सामना करावा लागला आहे की, त्यांच्या कुटुंबातील मुले शेकडो सावत्र भावंडांसह एका मोठ्या नातेसंबंधाच्या नेटवर्कचा भाग आहेत. नेदरलँड्समध्ये प्रजनन घोटाळ्यांपैकी हे प्रकरण सर्वात नवीन आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)