Doomsday Fish And Taiwan Earthquake: डूम्सडे फिश दिसल्याने तैवानमध्ये भूकंप आल्याच्या चर्चा; अभ्यासकांनी फेटाळला दावा, जपानी पौराणिक कथांमध्ये अजब दावा

ज्यामुळे अनेक शंका आणि अंधश्रद्धेतून असलेल्या समज-गैरसमजांना उधान आले. डूम्सडे फिश (Doomsday Fish) असे या माशाचे नाव आहे. सांगितले जाते की, हा मासा अतिशय दुर्मिळ आढळतो तसेच त्याचे दर्शनही दुर्मिळच होत असते.

Oarfish Dubbed Doomsday Fish (Photo Credit: X/ @mian_arehman)

Doomsday Fish Superstition: फिलीपिन्समधील एका मच्छिमाराने (Philippines Fisherman) अलीकडेच एक मासा पकडला. ज्यामुळे अनेक शंका आणि अंधश्रद्धेतून असलेल्या समज-गैरसमजांना उधान आले. डूम्सडे फिश (Doomsday Fish) असे या माशाचे नाव आहे. सांगितले जाते की, हा मासा अतिशय दुर्मिळ आढळतो तसेच त्याचे दर्शनही दुर्मिळच होत असते. या माशाबाबत काही देशांमध्ये अख्याईकाही सांगितली जाते. ती अशी की, हा मासा दिसल्यानंतर काहीतरी अघटीत घडते, एखादे संकट किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवते. धक्कादायक म्हणजे, मच्छिमाराने दावा केला आहे की, तौवानमध्ये भूकंप (Taiwan Earthquake) घडण्यापूर्वी काहीच काळ आगोदर हा मासा त्याच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर काहीच तासांनी तैवानमध्ये तब्बल 7.4 तीव्रतेचा भूकंप आला. जो पाठिमागील 25 वर्षांमधील सर्वात शक्तिशाली मानला जात आहे. तैवान भूकंपात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 1,000 हून अधिक जखमी झाले.

डूम्सडे मासा भूकंपाचा अग्रदूत?

सांगितले जाते की, डूम्सडे फिश (Doomsday Fish) समूद्रतळाशी जवळपास 3,300 फूट खोल पाण्यात आढळतो. तो सहसा समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा समुद्रकिनारपट्टीत येत नाही. जपानी लोककथांमध्ये हा मासा भूकंपाच्या घटनांचा अग्रदूत म्हणून ओळखला जातो. जेव्हा केव्हा भूकंप किंवा तत्सम घटना घडत असतात तेव्हाच तो उथळ पाण्यात येत असतो. द मिररच्या हवाल्याने आमची सहकारी इंग्रजी वेबसाईट लेटेस्टलीने दिलेल्या वृत्तानुसार हा मासा हुआलियन परगण्यात भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 900 मैल दक्षिणेला कलंगगामन बेटाजवळ सापडला. हा मासा पकडणरा मच्छिमार ब्रेन्जेंग कायोन याने सांगितले की, हा मासा सापडणे म्हणजे काहीसे अपशकूण घडणारे आहे. हा मासा सापडल्यानंतर तैवानमध्ये भूकंप घडला असेही तो म्हणाला. त्याने सांगितले की, हा मासा पाच फूट लांब आणि 15 किलो वजनाचा आहे.

अंधश्रद्धेचे मूळ जपानी पौराणिक कथांमध्ये

डूम्सडे फिश (Doomsday Fish) बद्दल असलेल्या अंधश्रद्धेचे मूळ जपानी पौराणिक कथांमध्ये आहे. जे सुचविते की हे मासे भूकंपाच्या आधी पृष्ठभागावर येतात आणि समुद्रकिनाऱ्यांवर जातात. त्यामुळे आगोदरच लोककथा आणि अख्यायीकांमधून विशिष्ट कारणांसाठी बदनाम असलेला हा मासा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या दर्शनामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, या माशांबद्दल अनेक समज गैरसमज, अंधश्रद्धा बाळगली जात असली तरी, हिरोयुकी मोटोमुरा, कागोशिमा विद्यापीठातील इचथियोलॉजीचे प्राध्यापक यांनी मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. तसेच, जोर देत सांगितले की, या माशांचे समुद्रकिनाऱ्यावर दर्शन आणि भूकंप यांचा संंबंध असणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्यापपर्यंततरी आढळला नाही. त्यामुळे लोकांनी अशा गोष्टींवर उगाच विश्वास ठेऊ नये.