UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
अल-अयाला हे केवळ मनोरंजन नाही तर ती एक पारंपारिक कला आहे. अल-अयाला ला युनेस्कोने मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage of Humanity) म्हणून मान्यता दिली आहे.
UAE मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (US President Donald Trump) यांच्यासमोर महिलांनी मोकळे केस फिरवत पारंपारिक पद्धतीने स्वागत केल्याचा एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये महिला पांढर्या कपड्यांमध्ये गाणं म्हणत मोकळे केस फिरवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हे काय चाललं आहे? असा प्रश्न पडला आहे. तर ही यूएई मधील एक जुनी परंपरा आहे. त्याला Al-Ayyala म्हणतात. डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासमोर हे नृत्य प्रतिष्ठित पाहुण्यांसाठी आदराची भावना व्यक्त करण्यासाठी सादर केले गेले.
वायरल व्हिडिओ मध्ये काय दिसतय?
सध्या सोशल मीडीयात वायरल क्लिप मध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांच्या दोन्ही बाजूला महिला एका रांगेत उभ्या दिसत आहेत.हा व्हिडिओ युएईचे राष्ट्रपती भवन, कासर अल वतन (Qasr Al Watan) येथील आहे. या महिलांनी पांढर्या रंगाचे गाऊन घातले आहेत आणि त्यांचे लांब, काळेभोर केस आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चालत येत असताना, महिला त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पुरुषांनी वाजवलेल्या वाद्याच्या तालावर त्यांचे केस फिरवत आहेत.
Al-Ayyala म्हणजे काय?
युनेस्कोच्या अहवालानुसार, Al-Ayyala हे ओमान आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमध्ये लोकप्रिय आहे. या पारंपारिक नृत्यात, कविता गायली जाते आणि सहभागी नृत्य करत असताना वाद्य वाजवलं जातं. युद्धाची स्थिती दाखवण्यासाठी पुरुष तलवारी किंवा बांबूच्या काठ्या घेऊन एकमेकांसमोर दोन रांगेत उभे असतात. ते संगीताच्या तालावर आपले डोके आणि तलवारी हलवतात.
महिला पारंपारिक पोशाख घालून आणि समोर उभ्या राहून नृत्यात सहभाग घेतात. ते संगीताच्या धुनेप्रमाणे त्यांचे केस एका बाजूला वळवतात.
Al-Ayyala कधी करतात?
Al-Ayyala हा प्रामुख्याने लग्न समारंभात करतात. ओमान आणि United Arab Emirates मधील लोक उत्सवाच्या वेळी देखील हे नृत्य करतात. अल-अयालामध्ये सर्व वयोगटातील, लिंगातील आणि सामाजिक वर्गांतील लोकं सहभागी होऊ शकतात.
अल-अयाला हे केवळ मनोरंजन नाही तर ती एक पारंपारिक कला आहे. अल-अयाला ला युनेस्कोने मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage of Humanity) म्हणून मान्यता दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)