Coronavirus: कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी डोनाल्ड ट्रप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली Hydroxychloroquine टॅबलेट्सची मागणी

कोरोनाच्या महासंकटापासून वाचण्यासाठी मोदींनी शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चत भारत-अमेरिका कोरोना व्हायरस या महामारीविरोधात लढण्यास संपूर्ण ताकतीचा प्रयत्न करतील, असा संकल्प करण्यात आला.

PM Narendra Modi and US President Donald Trump (Photo Credits: ANI)

Coronavirus: कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे Hydroxychloroquine टॅबलेट्सची मागणी केली आहे. कोरोनाच्या महासंकटापासून वाचण्यासाठी मोदींनी शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चत भारत-अमेरिका कोरोना व्हायरस या महामारीविरोधात लढण्यास संपूर्ण ताकतीचा प्रयत्न करतील, असा संकल्प करण्यात आला.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे अमेरिकेला हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) टॅबलेट्स च्या पुरवठ्याची मागणी केली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मीदेखील ही टॅबलेट घेऊ शकतो, यासाठी मला डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल, असं म्हटलं. अमेरिकेत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अमेरिकेत तब्बल 300,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8300 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेहीवाचा - Coronavirus Outbreak: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! 300,000 लोकांना कोरोनाची लागण तर मृत्यांची संख्या 8000 वर; जगात कोरोनाच्या बळींची संख्या 60000 च्या पार)

सध्या भारताने Hydroxychloroquine टॅबलेट्सची निर्यात थांबवली आहे. भारतातील पुरवठा लक्षात घेता या गोळीची निर्यात थांबवण्यात आली असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. सध्या अमेरिका तसेच इतर देशांकडून या टॅबलेट्सची मागणी वाढली आहे. ही टॅबलेट मलेरिया आजारावर उपयुक्त ठरते. तसेच कोरोना झालेल्या रुग्णांवरदेखील ही गोळी फायदेशीर ठरत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवर चर्चा केली. यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली होती. यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करोना व्हायरस या महामारी संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. भारत आणि अमेरिका मिळून या महामारीचा सामना करतील, असंही मोदींनी म्हटलं होतं.