Donald Trump Iran Warning: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला ‘Unconditional Surrender’ साठी इशारा; म्हणाले 'Supreme Leader' कुठे लपले अमेरिकेला ठाऊक

इस्रायल-इराण संघर्ष वाढत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च नेत्याचे नेमके स्थान माहित आहे. यूएस अध्यक्षांनी सोशल मीडियावर बिनशर्थ आत्मसमर्पण अशी पोस्ट करत इराणला इशाराही दिला आहे.

Ayatollah Khamenei, Donald Trump | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Unconditional Surrender: इराण आणि इस्रायल (Iran Israel Conflict) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका सध्या इराणी हवाई क्षेत्रावर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Khamenei) कुठे लपले आहेत हे देखील माहित आहे. ट्रुथ या सोशल मीडिया मंचावर पोस्ट करत ट्रम्प म्हणाले, आमच्याकडे आता इराणमधील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि संरक्षण उपकरणं आहेत, पण अमेरिकेच्या बनावटीच्या उपकरणांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. यूएसए’सारखा कोणी नाही.'

'आम्हाला नक्की माहिती आहे'

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला नक्की माहिती आहे की 'Supreme Leader' कुठे लपले आहेत. तो एक सोपा टार्गेट आहे, पण सध्या तिथे सुरक्षित आहे – आम्ही त्याला ठार मारणार नाही, किमान आत्तासाठी तरी नाही. पण आम्हाला आमच्या नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागली जाणं मान्य नाही. आमचं संयम आता संपत चाललं आहे.' यानंतर त्यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये फक्त एकच वाक्य लिहिलं – “UNCONDITIONAL SURRENDER!” (हेही वाचा, Israel Iran Conflict: इराणचे लष्करी प्रमुख Ali Shadmani ठार, आयडीएफचा दावा)

''बिनशर्थ आत्मसमर्पण''

तेहरानमध्ये स्फोटांची मालिकाः संघर्षाचा पाचवा दिवस

इराण-इस्रायल संघर्षाचा पाचवा दिवस सुरू असताना तेहरानमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले आहेत. राजधानीतील नर्मक, सय्यद खानदान, साउथ माजिदीयह, इराकी स्ट्रीट आणि नॉर्थ साबालान या भागांमध्ये सलग स्फोट झाले असून धुराचे लोट पाहायला मिळाले आहेत. (हेही वाचा, Iran-Israel War: इराणमध्ये मोठा विध्वंस! तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला; इस्रायलने बंकरवर टाकला बॉम्ब)

एका रहिवाशाने सांगितले, 'तेहरान अजूनही हल्ल्यांच्या आगीने जळत आहे.' या घटनेमुळे इंटरनेट सेवा खंडित झाली असून पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी इराणने शिराजहून इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला केला. सध्या तेहरानमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय आहेत.

ट्रम्प यांचे स्पष्टीकरण: 'सीझफायरपेक्षा अधिक' पाहिजे

  • Air Force One वरून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, 'आम्ही सीझफायरपेक्षा अधिक चांगल्या उपायाकडे पाहत आहोत.' जेव्हा त्यांना याचा अर्थ विचारला गेला, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, 'एक खरा शेवट. केवळ सीझफायर नव्हे. शेवट.'
  • ट्रम्प यांनी संभाव्य राजनैतिक संवादाची शक्यता देखील दर्शवली. त्यांनी म्हटलं की, 'Vice President JD Vance किंवा Middle East Envoy Steve Witkoff यांना इराणशी संवाद साधण्यासाठी पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो,' एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
  • दरम्यान, ट्रम्प यांनी इस्रायली कारवाई सुरूच राहील, असेही स्पष्ट केले. 'पुढील दोन दिवसांत तुम्हाला कळेल. कोणीही थांबलेलं नाही,' असं त्यांनी CBS च्या पत्रकाराला सांगितलं.

इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष जागतिक तेल बाजाराला हादरवून गेला असून, एक मोठा प्रादेशिक युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देश कोणत्याही शांतीपर्यायाकडे वळणार की संघर्ष अधिक उग्र होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement