Donald Trump Administration कडून नव्या Student Visa Interviews वर स्थगिती; आता विद्यार्थ्यांच्या Social Media ची देखील चाचणी करण्याचा विचार

अमेरिकन कॉलेज, विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी "जर क्लास बुडवला, अभ्यास सोडून दिला किंवा माहिती न देता त्यांचा अभ्यासक्रम सोडला" तर ते भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकतात. असे X Post द्वारा सांगण्यात आले आहे.

47th President Donald Trump | X @ANI

ट्रम्प प्रशासनाकडून (Donald Trump Administration) सध्या US embassies आणि Consular Sections ना Student Visa साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्रम्प प्रशासन अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांची सोशल मीडिया तपासणी करावी का? यावर विचार करत आहे असे Politico मधील एका बातमीत म्हटले आहे.

"तात्काळ प्रभावीपणे, आवश्यक सोशल मीडिया स्क्रीनिंग आणि व्हेटिंगच्या विस्ताराच्या तयारीसाठी, कॉन्सुलर विभागांनी पुढील मार्गदर्शन जारी होईपर्यंत कोणताही अतिरिक्त विद्यार्थी किंवा exchange visitor (F, M, and J) व्हिसा अपॉइंटमेंट क्षमता वाढवू नये असे सांगण्यात आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

अहवालात असे नमूद केले आहे की जर प्रशासनाने या योजनेला पुढे नेले तर विद्यार्थी व्हिसाची प्रक्रिया "गंभीरपणे मंदावू" शकते. "यामुळे अनेक विद्यापीठांनाही नुकसान होऊ शकते जे त्यांच्या आर्थिक तिजोरीत वाढ करण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांवर जास्त अवलंबून असतात," असे त्यात म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने होमलँड सिक्युरिटी विभागाला हार्वर्ड विद्यापीठाचे स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम (SEVP) प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ हार्वर्ड आता परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही आणि विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचे स्थानांतर करावे लागेल किंवा त्यांचा कायदेशीर दर्जा गमावावा लागेल. Harvard University मध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या नोंदणी वर Trump Administration चे निर्बंध .

US Embassy च्या भारतीय विद्यार्थ्यांना सूचना

अमेरिकेमध्ये सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' च्या धोरणामुळे भारतीयांना फटका बसत आहे. अमेरिकन कॉलेज, विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी "जर क्लास बुडवला, अभ्यास सोडून दिला किंवा माहिती न देता त्यांचा अभ्यासक्रम सोडला" तर ते भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकतात. असे X  Post  द्वारा सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement