Disease X Outbreak in Congo: आफ्रिकेतील काँगोमध्ये 'एक्स' आजाराने घेतला 79 रुग्णांचा जीव; काय आहे 'या' आजारीची लक्षणे? जाणून घ्या

या आजाराला 'एक्स' (Disease X) असं नाव देण्यात आलं आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

Disease X in Congo प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@snehamordani)

Disease X Outbreak in Congo: आफ्रिकन देश काँगोला (Congo) एका रहस्यमय आजाराने थैमान घातले असून त्याचे विपरीत परिणाम देशातील लोकांना भोगावे लागत आहेत. या अज्ञात आजाराने आतापर्यंत अवघ्या 25 दिवसांत 79 लोकांचा बळी घेतला आहे असून 300 हून अधिक जणांना या आजारीची लागण झाली आहे. या आजाराला 'एक्स' (Disease X) असं नाव देण्यात आलं आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्यासही सांगण्यात आले आहे.

या आजाराची लक्षणे जवळजवळ फ्लूसारखीच आहेत. म्हणजेच संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या आजाराबद्दल काहीही माहिती नाही. या आजाराचे सर्वाधिक बळी किशोरवयीन (15 ते 18 वर्षे) आहेत. (हेही वाचा -Chikungunya Cases Increase in Maharashtra: महाराष्ट्रात चिकुनगुनिया प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ; खालावलेली आरोग्यसेवा आणि आर्थिक घटक कारणीभूत?)

दक्षिण-पश्चिम काँगोमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद -

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, दक्षिण-पश्चिम काँगोमध्ये या रहस्यमय आजाराचे पहिले प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर हा आजार झपाट्याने पसरला आणि 25 दिवसांत किमान 79 जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसून आली. हा आजार टाळण्यासाठी लोकांना मृतदेहांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. स्थानिक नेते सेफोरियन मंझांजा यांनी माध्यमांना सांगितले की. आजारी लोकांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती खूपच चिंताजनक बनत आहे. पांजी हा ग्रामीण भाग आहे, त्यामुळे येथे औषधे पोहोचणे अवघड आहे.  (हेही वाचा, Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ; डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुन्याचे 164 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ)

काँगोली नागरी समाजाचे नेते सिम्फोरियन मंझांजा यांनी रॉयटर्सला सांगितले की, संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. औषधांच्या पुरवठ्यातही काही अडचण आहे. आरोग्य विभागाची पथके येथे पाठवण्यात येत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना शांत आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना साबणाने वारंवार हात धुवावे, सामूहिक मेळाव्यात जाणे टाळावे आणि पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय मृतदेहाला स्पर्श करू नये, असेही आवाहन केले आहे.

स्थानिक तज्ज्ञांच्या मते, महिला आणि लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा आजार गेल्या आठवड्यातच आढळून आला. यूएन हेल्थ एजन्सी आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे यावर संशोधन करत आहेत.