अमेरिकेतही आता 'Diwali' सार्वजनिक सुट्टीचा दिवस होणार? Congressman Carolyn Maloney मांडणार विधेयक

Capitol Hill वर काही भारतीय प्रवासी देखील उपस्थित होते.

US Congressman Carolyn Maloney (Photo Credits: Facebook)

अमेरिकेमध्ये आता दिवाळी हा Federal Holiday म्हणून जाहीर करण्यासाठी Congressman Carolyn Maloney विधेयक (Bill) सादर करणार आहेत. येत्या बुधवारी न्यू यॉर्कचे डेमोक्रॅट कॉंग्रेसमॅन यांच्यासह Congressman Ro Khanna, Raja Krishnamoorthi बिल मांडण्यासाठी पाठिंबा देणार आहेत. या करिता भारतीय वंशाची देखील काही मंडळी आपला पाठिंबा देणार आहेत.

अमेरिकेमध्ये जर बिल पास झाले तर अमेरिकेमध्ये ज्या भागात भारतीयांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी इंडियन अमेरिकन वंशाच्या नागरिकांना आपला सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी अमेरिकेमध्ये दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. यापूर्वी कॉंग्रेसमॅन Carolyn Maloney च्या प्रयत्नाने दिवाळी स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 2016 सालपासून ते व्यवहारामध्ये आहेत. Maloney यांच्या मते, लहान लहान गोष्टी देखील मिलियन लोकांसाठी मोठ्या गोष्टी बदलू शकतात. यंदा भारतासह जगभरात स्थायिक भारतीय 4 नोव्हेंबर दिवशी दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. Diwali 2021 Calendar With Dates in India: यंदा दिवाळीत धनतेरस, लक्ष्मी पूजन ते भाऊबीज कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

मागील आठवड्यातच अमेरिकेमध्ये काही व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी आणि युएस लॉमेकर्सनी दिवाळी साजरी केली आहे. Capitol Hill वर काही भारतीय प्रवासी देखील उपस्थित होते.

Vice Admiral Surgeon Gen Vivek Murthy यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणाले, 'मागील दीड वर्ष खूप अंधार आहे. दिवाळी साजरी करणं आणि त्याविषायी बोलणं आता गरजेचे आहे.'

अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या एका वार्षिक कार्यक्रमामध्ये जो बायडन यांच्या प्रशासनामधील Vice Admiral Surgeon General Vivek Murthy आणि जो बायडन यांचे सिनियर अ‍ॅडव्हायझर आणि स्टाफ सिक्रेटरी Neera Tanden यांचा सत्कार केला आहे.