South Africa Gas Leak Incident: धक्कादायक, आफ्रिकेत विषारी वायू गळती, श्वास घेण्यास त्रास झाल्याने 16 लोकांचा मृत्यू

धक्कादायक म्हणजे या घटनेत लहान मुलांचाही समावेश आहे.

South Africa Gas Leak Incident: धक्कादायक, आफ्रिकेत विषारी वायू गळती, श्वास घेण्यास त्रास झाल्याने 16 लोकांचा मृत्यू
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

South Africa Gas Leak Incident:  खाणीत सोन्याची प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विषारी नायट्रेट वायूच्या गळतीमुळे तीन मुलांसह , 16 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना  दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे घडली आहे. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास विषारी  वायू गळती झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  स्थानिक  पोलीस अधिकार्‍यांनी बुधवारी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.

विषारी वायू मुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होवू लागले आणि परिणामी लोकांचा मृत्यू झाला. आपत्कालीन सेवांनी सुरुवातीला जाहीर केले की जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील शहर बोक्सबर्गमधील वायू लीकच्या दुर्घटनेत 24 लोक मरण पावले आहेत. परंतु पोलिस आणि गौतेंग प्रांताचे प्रीमियर पन्याझा लेसुफी यांनी मृतदेहांच्या पुनर्गणनेनंतर  सांगितले की मृत्यूची संख्या 16 आहे.

बचावकार्य रात्रीपर्यंत इतर मृतदेहांचा शोध घेत राहीले. कोणत्याही रुग्णावर पॅरामेडिक्सकडून उपचार केले जात नव्हते. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांंचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने या घटनेसंर्दभात शोक व्यक्त केला आहे.  या घटनेत तीन लहान मुलांचा समावेश आहेत. दोघांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपुर्ण शहरात शोककला पसरली आहे.