Pakistan: पाक नौदलाच्या 5 अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय; युद्धनौका पळवण्याचा रचला होता कट
इस्लामाबादमधील सर्वोच्च न्यायालयाने 'जनरल कोर्ट मार्शल'च्या आदेशाने यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावलेल्या पाकिस्तानी नौदलाच्या पाच माजी अधिकाऱ्यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
Pakistan: इस्लामाबादमधील सर्वोच्च न्यायालयाने (Islamabad High Court)'जनरल कोर्ट मार्शल'च्या आदेशाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या पाकिस्तानच्या नौदलाच्या ५ माजी(Pakistan Navy officers) अधिकाऱ्यांची फाशी स्थगित केली आहे. ‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे (IHC) न्यायाधीश बाबर सत्तार यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून मंगळवारी लेखी आदेश जारी केला. (हेही वाचा: Pakistan: भरदिवसा दोन बकऱ्या चोरल्या, घटना CCTV कैद, पाकिस्तानमधील Video व्हायरल)
या प्रकरणाच्या सुनावणीत नौदलाच्या जज अॅडव्होेकेट जनरल आरोपींना वकिल देण्यासही नकार दिला होता. कायदेशीर मदत देण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे इस्लामाबादमधील सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देत म्हटले की, “जगण्याच्या हक्काच्या संरक्षणाचा आणि योग्य प्रक्रियेचा मूलभूत प्रश्न असल्याने याचिका निकाली निघेपर्यंत याचिकाकर्त्यांना फाशी दिली जाणार नाही.”
नेमके प्रकरण काय?
इस्लामिकस्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असणाऱ्या पाकिस्तानच्या नौदलातील पाच अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकन नौदलाच्या इंधन भरणाऱ्या जहाजांपैकी एका जहाजावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी युद्धनौका पळवून नेण्याचा कट त्यांनी रचला होता, असा आरोप आहे.
कराची नौदलाच्या डॉकयार्डवर सप्टेंबर २०१४ रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सब-लेफ्टनंट हम्माद अहमद आणि इतर चार नौदल अधिकारी सहभागी होते, असा निकाल देऊन नौदलाच्या लवादाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. इसिसशी संबंध, बंडखोरी, कट रचणे आणि डॉकयार्डमध्ये शस्त्रास्त्रे बाळगणे असे आरोप त्यांच्यावर होते, असे वृत्त ‘द डॉन’या वृत्तपत्राने हम्मादचे वडील निवृत्त मेजर सईद अहमद यांच्या हवाल्याने दिले आहे.