Dawood Ibrahim Dead Or Alive: दाऊद इब्राहिम चे कोरोनामुळे निधन? सोशल मीडियावर पसरतायत तुफान अफवा, वाचा सविस्तर

त्यानंतर सध्या समोर येणाऱ्या चर्चांनुसार मात्र आता दाऊदचे कोरोनामुळे निधन झाल्याचे म्हंटले जातेय. वास्तविक सोशल मीडियावर या बाबत चर्चा असल्या तरी याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

File image of Dawood Ibrahim | (Photo Credits: PTI)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर सध्या समोर येणाऱ्या चर्चांनुसार मात्र आता दाऊदचे कोरोनामुळे निधन झाल्याचे म्हंटले जातेय. वास्तविक सोशल मीडियावर या बाबत चर्चा असल्या तरी याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण होताच त्यांना कराची (Karachi)  मधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले होते. दुसरीकडे, डी-कंपनीचे अंडरवर्ल्ड ऑपरेशन सांभाळणारा दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम (Anis Ibrahim) याने दाऊदच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे म्हणत दाऊद आणि त्याचे पत्नी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी काही, गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण होताच त्यांना रुग्णालयात लगेचच दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षक व वाहन चालकांना सुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र अनीस इब्राहिम याने दाऊद याच्या मृत्युबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, " कोरोना महामारी ही जागतिक समस्यां ठरली आहे आणि हे एक भीषण संकट आहे. मात्र दाऊद आणि त्याची पत्नी यांना याची कोणतीही लागण झाली नाही, ते दोघेही घरी सुरक्षित आहेत.

पहा पोस्ट

Dawood Ibrahim Death Due To Coronavirus (Photo Credits: Twitter Screenshot )

दरम्यान, भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील त्याच्या सहभागाबद्दल त्याच्यावर सध्या 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.