युरोपात अद्याप Covishield ला मान्यता नाही, लस घेतलेल्यांना मिळणार का Vaccination Passport? जाणून घ्या अधिक

या अभियानाअंतर्गत देशातील बहुतांश नागरिकांन सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड लसीचा (Covishield Vaccine) डोस घेत आहेत.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. या अभियानाअंतर्गत देशातील बहुतांश नागरिकांन सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड लसीचा  (Covishield Vaccine) डोस घेत आहेत. मात्र कोविशील्ड लसीला काही देशांनी मान्यता दिलेली नाही. याच संबंधित एक बातमी समोर येत आहे. एका रिपोर्ट्सनुसार कोविशील्ड लस घेतलेले प्रवासी हे EU च्या 'ग्रीन पास' किंवा 'वॅक्सीनेशन पासपोर्ट'साठी पात्र ठरणार नाही आहेत. जे 1 जुलै पासून वॅक्सीन सर्टिफिकेटच्या रुपात वापरासाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.(Philippines: 'कोरोना विरोधी लस घ्यायची नसेल तर भारतामध्ये जा'; अध्यक्ष Rodrigo Duterte यांचे वादग्रस्त विधान)

खरंतर EU चे काही सदस्य देशांनी डिजिटल वॅक्सीन पासपोर्ट जाहीर करणे सुरु केले आहे.जे युरोपीय लोकांना प्रवासासाठी स्वतंत्र रुपात येण्याजाण्याची परवानगी देतो. प्रवास करणाऱ्या व्यक्तिसाठी वॅक्सीन पासपोर्ट हा त्याने लस घेतल्याचे दर्शवले जाणार आहे. दरम्यान, ईयु ने असे म्हटले की सदस्य देशांनी या गोष्टीची परवाह न करता वॅक्सिन पासपोर्ट जाहीर करावा की त्याने नेमकी कोणती लस घेतली आहे. परंतु असे संकेत समोर येत आहेत की, ग्रीन पास, ईयू-व्यापी विपणन प्राधिकरण येथून प्राप्त केलेल्या लसीपर्यंतच सीमित असणार आहे.(Dog Meat Festival: कोरोना काळातही चीनमध्ये डॉग मीट महोत्सवाचे आयोजन; हजारो कुत्र्यांना मारून खाल्ले जाते त्यांचे मांस)

सध्या युरोपीय मेडिसिन एजेंसी (EMA) कडून कोरोनाच्या चार लसींना मान्यता देण्यात आली आहे. कॉमिरनाटी (फायजर/बायोएनटेक), मॉडर्ना, वॅक्सजेरविया (एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्ड) आणि जानसेना (जॉनसन अॅन्ड जॉनसन). या लसींचा वापर युरोपी संघातील सदस्य देशांकडून सर्टिफिकेट किंवा वॅक्सीन पासपोर्ट जाहीर करण्यासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, वॅक्सजेवरिया आणि कोविशील्ड दोन्ही एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्टच्या लसी आहेत. मात्र EMA ने आतापर्यंत भारतात तयार केलेली कोविशील्डला मान्यता दिलेली नाही. पण कोविशील्डला डब्लूएचओकडून मान्यता मिळाली आहे.