COVID-19 Vaccine:'कोविड ला रोखण्यासाठी आपल्याकडे ठोस लस उपलब्ध असेल की नाही याची अजूनही खात्री नाही' UK Taskforce Chief यांचं मत

त्यांच्या माहितीनुसार, कोविड 19 विरूद्ध आता अंतिम टप्प्यात असलेली आणि लव्करच बाजारात उपलब्ध करून दिली जाणारी लस ही सार्‍यांसाठीच परिणामकारक असेलच असे नाही.

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

मागील 7-8 महिन्यांपासून जगभरात झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना वायरसला रोखण्यासाठी आता लस आली की सारं काही सुरळीत होईल असा तुमचा विचार असेल तर जरा थांबा. UK Vaccine Taskforce च्या चेअरवुमन Kate Bingham यांनी याविषयी एक मोठं विधान केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, कोविड 19 विरूद्ध आता अंतिम टप्प्यात असलेली आणि लव्करच बाजारात उपलब्ध करून दिली जाणारी लस ही सार्‍यांसाठीच परिणामकारक असेलच असे नाही. त्यांनी असेदेखील म्हटलं आहे की जगात कोविड 19 वर 100% परिणामकारक लस आपण देऊ याची खात्री नाही. त्यामुळे लोकांनी हलगर्जीपणा करणं योग्य नाही त्यांना कायम काळजी घ्यावीच लागेल. कोविड 19 लसींबाबत गूडन्यूज! Johnson & Johnson ची लस जानेवारी 2021 पर्यंत येण्याची शक्यता तर Oxford-AstraZeneca vaccine वयोवृद्धांमध्येही सकारात्मक परिणाम देत असल्याची माहिती

सध्या सुरुवातीला तातडीने मंजुरी मिळवून बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार्‍या लसी कदाचित प्रत्येकासाठी फायदेशीर नसतील. कदाचित या लसी लक्षणं कमी करू शकतील पण पूर्ण धोका टाळू शकणार नाहीत. The Lancet medical journal मध्ये त्यांनी लिहलेल्या लेखात आपण कधी या वायरसवर लस शोधू शकणार आहोत का? याचीदेखील पूर्ण खात्री नाही. त्यामुळे बेपर्वाई नको तसेच लसीबद्दल अति आशावादी राहणं देखील चुकीचं आहे. UK Sex Ban: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम.

जगभरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वायरसला रोखण्यासाठी सध्या लस निर्मितीची जी क्षमता आहे ती देखील पुरेशी नाही. यावेळी त्यांनी युके मध्ये ख्रिसमसच्या आसपास हाय रिस्क गटातील लोकांसाठी लस उपबद्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास बोलून दाखवला आहे. दरम्यान Financial Times शी या महिन्याच्या सुरूवातीला बोलताना त्यांनी कोविड 19 ची लस आल्यानंतर तातडीने ती उपलब्ध करुन दिली जाईल हा भ्रम आहे.

सध्या अमेरिका, युके, रशिया, भारत,चीन या प्रमुख देशांमध्ये एकापेक्षा अधिक लसींच्या संशोधनावर काम सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif