Covid-19 in China: लवकरच चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात होऊ शकतो 25,000 लोकांचा मृत्यू, तज्ञांचा इशारा

हे प्रमाण लोकसंख्येच्या 18% आहे. त्याचा परिणाम जगभरात दिसून येईल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञ देत आहेत.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या दहशतीला तोंड देत असलेल्या चीनसाठी येणारे काही दिवस अत्यंत चिंताजनक ठरणार आहेत. चीनमध्ये एकीकडे संसर्गाची लाखो प्रकरणे समोर येत आहेत आणि हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, तर दुसरीकडे तज्ञांचे मत आहे की चीनमधील परिस्थिती अजूनच चिघळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये दररोज 9,000 मृत्यू होत असल्याची भीती ब्रिटनच्या आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे.

हा आकडा गेल्या आठवड्यातील अंदाजापेक्षा दुप्पट आहे. यूकेच्या हेल्थ डेटा फर्म एअरफिनिटीनुसार, 1 डिसेंबरपासून चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

कंपनीचा विश्वास आहे की, चीनमध्ये कोविड संसर्गाची प्रकरणे साधारण 13 जानेवारी रोजी पीकवर जातील. त्यावेळी देशात एका दिवसात 37 लाखांहून अधिक रुग्ण आढळू शकतात. यातील अजून एक गंभीर बाब म्हणजे, फर्मचा असा विश्वास आहे की 23 जानेवारीच्या आसपास चीनमध्ये एका दिवसात 25 हजारांहून अधिक मृत्यू होऊ शकतात. त्यानंतर चीनमध्ये एकूण मृतांचा आकडा 6 लाखांच्या जवळपास पोहोचू शकतो.

चीनवर कोरोनाशी संबंधित अचूक डेटा न दिल्याचा आरोप होत असताना, हे अंदाज लावले जात आहेत जेव्हा आहे. चिनी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 7 डिसेंबर रोजी केवळ 10 जणांचा मृत्यू झाला होता. याविषयी डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, संस्थेला चीनमधील संसर्गाच्या प्रकरणांच्या तीव्रतेबद्दल आणि विशेषत: तेथील रुग्णालये आणि आयसीयूमध्ये रुग्णांच्या भरतीच्या संदर्भात अधिक माहितीची आवश्यकता असेल, जेणेकरून एकूण परिस्थितीचे मूल्यांकन करता येईल. (हेही वाचा: कोविड रुग्णांचे आकडे न लपवता ते जगासोबत शेअर करा; WHO ने चीनला फटकारले)

दरम्यान, एचके पोस्टच्या अहवालानुसार, डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात चीनमध्ये 250 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण लोकसंख्येच्या 18% आहे. त्याचा परिणाम जगभरात दिसून येईल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. अमेरिका, भारतासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोविड सुनामी येऊ शकते, अशी शंका वर्तवली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif