Coronavirus Outbreak: जगभरात तब्बल 53 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग; 3 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू

वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या कचाट्यात जगभरातील तब्बल 53 लाख नागरिक अडकले आहेत.

COVID 19 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. चीनमधून (China) परसलेल्या कोविड 19 (Covid 19) विषाणूने हळूहळू इतर देशांमध्ये आपली व्याप्ती वाढली आणि त्यानंतर झपाट्याने त्याचा प्रसार झाला. वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या कचाट्यात जगभरातील तब्बल 53 लाखांहून अधिक नागरिक अडकले आहेत. तर 342,000 रुग्णांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. आज सकाळीपर्यंत जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 5,309,698 इतका होता. तर बळींची संख्या 342,078 इतकी होती. अशी माहिती विद्यापीठाच्या सिस्टीम सायन्स अँड इंजिनियरिंग केंद्राने (University's Center for Systems Science and Engineering) दिली आहे. कोविड 19 ची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा भयंकर मोठा असून नक्कीच चिंता वाढवणारा आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत तब्बल 1,622,605 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 97,087 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलचा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 347,398 नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. (Coronavirus: चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना, जागतिक स्पर्धेतील दिग्गज खेळाडूचा धक्कादायक दावा)

CSSE च्या आकडेवारीनुसार, अमेरिका, ब्राझील नंतर रशिया 335,882, युके 258,504, स्पेन 235,290, इटली 229,327, फ्रान्स 182,036, जर्मनी 179,986, तुर्की 155,686, इराण 133,521, भारत 131,423 आणि पेरु 115,754 अशी कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या देशांची क्रमवारी आहे.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेनंतर युकेमध्ये अधिक आहे. युके मध्ये कोरोनाने घेतलेल्या बळींचा आकडा 36,757 इतका आहे. तर 10 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेल्या देशांत इटली (32,735), स्पेन (28,678), फ्रान्स (28,218) आणि ब्राझील (22,013) या देशांचा समावेश आहे.