Coronavirus Worldwide Cases: कोरोना व्हायरसमुळे जगभरातील रुग्णांचा आकडा 2.43 कोटींच्या पार, आतापर्यंत 829,861 जणांचा बळी
तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढून 829000 वर पोहचला आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यानुसार, जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा एकूण 2.43 कोटींच्या पार गेला आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढून 829000 वर पोहचला आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग सीएसएसई यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, सकाळपर्यंत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांचा आकडा 24,356,619 वर पोहचला आहे. तसेच कोविड19 मुळे बळींचा आकडा 829,861 वर गेला आहे.
सीएसएसई यांच्या नुसार, जगभरातील सर्वात मोठा कोरोना व्हायरसचा फटका अमेरिकेला बसला आहे. येथे 5,863,363 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचसोबत कोरोनाच्या संक्रमणामुळे 180,595 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र ब्राझील 3,761,391 रुग्णांसह 118,649 जणांचा बळी गेल्याने दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.(Coronavirus: Sputnik V Vaccine संदर्भात भारत आणि रशिया यांच्यात संवाद सुरु)
सीएसएसई यांच्या मते भारतात 3,310,234 रुग्ण संख्या असून तिसऱ्या स्थानकावर, त्यानंतर रूस 972,972, दक्षिण अफ्रीका 618,286, पेरू 613,378, मेक्सिको 579,914, कोलंबिया 572,243, स्पेन 429,507, चिली 404,102, अर्जेंटीना 380,292, ईरान 367,796, ब्रिटेन 332,491, सऊदी अरब 311,855, बांग्लादेश 304,583, फ्रांस 297,485, पाकिस्तान 294,638, तुर्की 263,998, इटली 263,949, जर्मनी 240,571, इराक 219,435, फिलीपींस 205,581, इंडोनेशिया 162,884, कॅनडा 128,836, कतार 117,988, यूक्रेन 114,663, बोलिविया 112,094, इक्वाडोर 111,219, इज्राइल 110,403 आणि कजाकिस्तान 105,243 रुग्णांची संख्या आहे.(When Will Coronavirus End: कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर)
तर 10,000 हून अधिक जणांचा बळी गेलेले देष म्हणजे मेक्सिको 62,594, भारत 60,472, ब्रिटेन 41,564, इटली 35,463, फ्रांस 30,581, स्पेन 28,996, पेरू 28,124, ईरान 21,137, कोलंबिया 18,184, रूस 16,758, दक्षिण अफ्रीका 13,628 आणि चिली 11,07 यांचा समावेश आहे.