Coronavirus & Playboy: प्लेबॉय मासिक झाले कोरोना व्हायरस बाधित, छापाई बंद करुन डिजिटल अवृत्तीकडे लक्ष

प्ले बॉय मासिकाला जगभरात प्रसिद्धी मिळाली. ते प्रचंड लोकप्रिय झाले. पण, त्यावर तितकीच टीकाही झाली. काही असले तरी गेली अनेक वर्षे हे मासिक प्रचंड मोठ्या संख्येने छापले गेले आणि वितरीतही करण्यात आले. जगभरातील अनेक देशांमध्ये (बहुदा सर्वच) या मासिकाचे चाहते आहेत. त्यामुळे मासिकाच्या अनेक अवृत्त्या निघत आणि त्या खपतही.

Kylie Jenner for Playboy | Image used for representational purpose (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगप्रसिद्ध अशा प्लेबॉय (Playboy) मासिकाच्या जीवार उठला. ज्यामुळे प्लेबॉय मासिक (Playboy Magazine) अखेर बंद केले जाणार आहे. प्लेबॉय या पुढे आपली छापाई बंद करणार आहे. या आठवड्यात प्रकाशित होणारा Spring 2020 हा प्लेबॉय मासिकाचा अमेरिकेतील शेवटचा छापील अंक असेल. प्लेबॉय एन्टरप्रायजेसचे सीईओ बेन कोहन (Ben Kohn) यांनीच तसे जाहीर केले आहे.

प्लेबॉय मासिकाचे सीईओ बेन कोहन यांनी बुधवारी (19 मार्च 2020, स्थानिक वेळेनुसार) सांगितले की, कोरोना व्हायरसचा फटका मासिकाला बसला आहेच. परंतू, कोरोना व्हायरस संकट येण्यापूर्वीपासूनच प्ले बॉय मासिकाची छापील अवृत्ती बंद करण्याबाबत आमचा विचार सुरु होता. इंटरनेटवर आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि मोफत प्रोर्नोग्राफी उपलब्ध आहे. तसेच, डीजिटल माध्यमही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अलिकडील काही काळात छापाई माध्यम अडचणीत आले आहे.

ह्युजन हेफनर (Hugh Hefner) यांनी 1953 मध्ये हे खास मासिक सुरु केले. जगभरातील टॉप मॉडेल आणि त्यांची अर्थनग्न छायाचित्रे. चटपटीत मजकूर अशी या मासिकाची रचना असे. त्या काळात प्रोर्नोग्राफी क्षेत्र फारसे बहरले नव्हते. नव्हते म्हणण्यापेक्षा उपलब्धच नव्हते. जगभरामध्ये सोवळे, रुढी परंपरा पाळला जाण्याचा तो काळ होता. अशा काळात हेफनर यांनी हे मासिक सुरु केले. मासिकातील आषय आणि मजकूर पाहून जगभरात ते प्रसिद्ध झाले नसते तरच नवल.

प्ले बॉय मासिकाला जगभरात प्रसिद्धी मिळाली. ते प्रचंड लोकप्रिय झाले. पण, त्यावर तितकीच टीकाही झाली. काही असले तरी गेली अनेक वर्षे हे मासिक प्रचंड मोठ्या संख्येने छापले गेले आणि वितरीतही करण्यात आले. जगभरातील अनेक देशांमध्ये (बहुदा सर्वच) या मासिकाचे चाहते आहेत. त्यामुळे मासिकाच्या अनेक अवृत्त्या निघत आणि त्या खपतही. (हेही वाचा, या मराठी मुलीने प्लेबॉय मासिकासाठी केले होते हॉट फोटोशूट)

दरम्यान, कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील कंपन्यांनीच वितरण व्यवस्था कोलमडली आहे. प्लेबॉय मासिकाची ‘सप्लाय चेन’ सुद्धा विस्कळीत झाली आहे. वितरण व्यवस्थाच कोलमडल्यामुळे अकं वाचकापर्यंत कसा पोहोचावायचा असाही एक प्रश्न होता. परिणामी तोटाही प्रचंड वाढत होता. अशा स्थितीत छापील अवृत्ती बंदच करुन थेट डिजिटल माध्यमाकडे आपले लक्ष वळवावे असे प्लेबॉय मासिकाच्या संपादक आणि प्रशासनाचा ओढा होता. अखेर तो निर्णय घेण्यात आला.

प्लेबॉयचे संस्थापक ह्यूज हेफनर यांचे 2017 मध्ये निधन झाले. अमेरिकेतील ते एक चर्चित, लोकप्रिय आणि बंडखोर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. हेफनर यांनी आयुष्यभर व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या मासिकात छापली जाणारी अर्धनग्न छायाचित्रे आणि उत्तान फोटो पाहून अमेरिकेतील टपाल कार्यालयांनी त्यांची मासिके पोहोचविण्यास नकार दिला. पण, हाडाचे व्यक्तिस्वातंत्र्यावादी असलेल्या हेफनर यांनी थेट न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. त्यात त्यांचा विजय झाला. अर्धनग्न आणि उत्तान फोटो छापणारे मासिक अशी प्लेबॉयची ओळक काही लोकांनी जरुर केली. पण, प्लेबॉयने या छायाचित्रांसोबत खुसखुशी, वैचारीक लेखन कायमच सुरु ठेवले. इग्रजी भाषेत प्रसारीत होणारे दर्देदार साहित्या, लेख यांचे विवध पैलू प्लेबॉय मासिकामुळे अनेकांना कळले हे नाकारता येणार नाही. अशा या दर्जेदार आणि तितक्याच लोकप्रिय मासिकाची अशी अखेर होणे हे हळहळ वाटायला लावणारे असेच.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now