Coronavirus Outbreak: जगभरात कोरोना वायरसने बळी घेतलेल्यांंची संंख्या 1300 पेक्षा अधिक

आता या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी चीनने नवी पद्धत अंमलात आणली आहे. त्यामुळे बुधवार (12 फेब्रुवारी) दिवशी लागण झालेल्यांमध्ये 23% वाढ झाली आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

जगभरात कोरोना वायरसची दहशत वाढत आहे. आता या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी चीनने नवी पद्धत अंमलात आणली आहे. त्यामुळे बुधवार (12 फेब्रुवारी) दिवशी लागण झालेल्यांमध्ये 23% वाढ झाली आहे. तर जगभरामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus)  बळी घेतलेल्यांची संख्या 1300 च्या वर गेली आहे. त्यामुळे आता या व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यापूर्वी व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो रूग्ण म्हणून गणला जात होता मात्र आता व्हायरसची लक्षणं दिसल्यास किंवा स्थानिक डॉक्टरांकडून निदान झाल्यास त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान चीन सरकारकडे मेडिकल कीटची कमतरता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला दिलं 'कोविड-19' हे अधिकृत नाव.

 

दरम्यान आज जपानमध्ये दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आता या रूग्णांना प्रशासनाकडून मदत केली जाणार आहे. भारतामध्ये केरळमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले होते. तसेच चीनमधूनही काही भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान तैनात करण्यात आले होते. त्यांची विशेष सोय करण्यात आली आहे.

WHO या आरोग्य संघटनेकडून काल कोरोना व्हायरसला 'कोविड-19' हे अधिकृत नाव देण्यात आलं आहे. चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला होता. कोरोना व्हायरसला 'कोविड-19' हे नाव देण्यामागचं कारण जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले आहे. 'कोविड-19' मधील को म्हणजे 'करोना', व्ही म्हणजे 'व्हायरस' आणि डी म्हणजे 'डिसीज'. या नावामागे विशिष्ट अर्थ दडलेला असल्याने कोरोनाचे 'कोविड-19' असे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे.

भारतासोबतच कोरोना वायरस श्रीलंका, जपान, थायलंड, अमेरिका, सौदी अरेबिया देशामध्ये पोहचला आहे. त्याला रोखण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.