Coronavirus: अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 बाधित तब्बल 2,000 नागरिकांचा मृत्यू
पुढे बोलताना कुओमो यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये 799 लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोना व्हारस संकटात 6,268 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
महासत्ता अमेरिका (United States) कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या विळख्यात अधिकच अडकत चालला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या हवाल्याने एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशीही सुमारे 2,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये काल 1,939 नागरिकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. त्यापेक्षा दुसऱ्या दिवशीचा आकडा अधिक आहे. दुसऱ्या दिवशी 1,973 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा आतापर्यंत तब्बल 14,695 इतका आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा हा स्पेनपेक्षाही अधिक आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत सुमारे 14,555 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्येही सुमारे 17,669 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्र्यू क्यूमो यांनी बुधवारी सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरस साथ ही आता स्थित झाली आहे. पुढे बोलताना कुओमो यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये 799 लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोना व्हारस संकटात 6,268 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरसच्या लढाईत ट्विटरचे सीईओ Jack Dorsey यांनी 28 टक्के संपती केली दान; जवळजवळ 7,500 कोटींची मदत)
जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना व्हायरस बाधा झाल्याने तब्बल 88,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. तर, जवळपास 15 लाख नागरिकांना कोरोना व्हायरस बाधा झाली असून, ते उपचार घेत आहेत.