Coronavirus: कोरोनाच्या संकटामुळे डोलारा कोसळण्याचा धोका; जगभरातील 100 पेक्षाही अधिक राष्ट्रांना हवीय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडू मदत

ज्या 102 राष्टांनी आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागणी केली आहे त्यात एल साल्वाडोर, इक्वाडोर, मोडागास्कर, रवांडा आणि टोगो यांसारख्या देशांचा समावेश आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) अर्थातच कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या जगभरातील 100 पेक्षाही अधिक राष्ट्रांना आर्थिक मदतीची आपेक्षा आहे. ही सर्व राष्ट्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) काय भूमिका घेते याकडे डोळे लाऊन आहेत. आयएमएफच्या (IMF) क्रिस्टालिना जॉर्जीर्वा यांनी निधीच्या वार्षिक स्प्रिंग मीटिंगमध्य व्हर्चुएल एडिशनच्या माध्यमातून सांगितले की, आम्ही अनपेक्षीत घटना घडते त्या काळात भेटतो आणि अशा काळात काय करायला हवे यावर विचारविनिमय करतो.

आलेल्या संकटाला पहिल्यांदा धिराने तोंड द्यायला हवे. त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहून एकजुटीने काम करायला हवे. एएफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या 102 राष्टांनी आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागणी केली आहे त्यात एल साल्वाडोर, इक्वाडोर, मोडागास्कर, रवांडा आणि टोगो यांसारख्या देशांचा समावेश आहे. यातील काही देशांना मान्यता मिळाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, विविध देशांच्या मागणीवर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (हही वाचा, Coronavirus: ढासळलेली अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी डोनाल्ड ट्रंप घेणार भारतीय दिग्गजांकडून सल्ले; स्थापन केली समिती, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांचा समावेश)

या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक फॉरकास्टमध्ये 2020 मध्ये 3 टक्क्यांची जागतिक आर्थिक मंदीबाबत भाष्य केले आहे. 2009 मध्ये जागतिक मंदीत 0.1 टक्का इतकी घसरण पाहायला मिळाली होती. अमेरिकच्या जीडीपीत 5.9 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यूरोपीय देशांमध्ये 7.5 टक्क्यांची घसरण होऊन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. जपानची अर्थव्यवस्थाही 5.2 टक्क्यांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.