Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे उपासमारी वाढण्याची शक्यता- गुटेरेस

या अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये जवळपास 69 कोटी नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागला आहे. हा आकडा 2018 च्या तूलनेत 1 कोटी पेक्षाही अधिक आहे.

Starve | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

संयुक्त राष्ट्र (United Nations) महासचिव एंटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरस संकटाचे परीणाम म्हणून जगभरातील देशांमध्ये उपासमारी (Starve) वाढू शकते. वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, 'द स्टेट ऑफ फूड सिक्योरिटी अॅण्ड न्यूट्रीशीएन इन द वर्ल्ड 2020' च्या अहवालात एंटोनियो गुटेरेस यांनी हा इशारा दिला आहे. या अहवालाचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये जवळपास 69 कोटी नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागला आहे. हा आकडा 2018 च्या तूलनेत 1 कोटी पेक्षाही अधिक आहे.

व्हिडिओमध्ये गुटेरेस यांनी म्हटले आहे की, 'द स्टेट ऑफ फूड सिक्योरिटी अॅण्ड न्यूट्रीशीएन इन द वर्ल्ड 2020' अहवाल जगभातील देशांसाठी एक इशारा आहे. जगभरात उपासमारीची संख्या मोठी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतीच आहे. त्यातच कोरोना व्हायरस संकट आल्यामुळे हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा, कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे जवळजवळ 1 कोटी मुले कायमची शाळा सोडू शकतात; Save the Children संस्थेने दिला ‘शैक्षणिक आणीबाणी’चा इशारा)

पुढे बोलताना गुटेरेस यांनी म्हटले की अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, विद्यमान स्थिती कायम राहिली तर आपण ठेवलेले शून्य उपासमारी हे लक्ष्य आपण 2013 पर्यंत गाठू शकणार नाही. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, आपण पृथ्वीवरील खाद्य उत्पादन अधिक टीकावऊ आणि विस्तारीत केले पाहिजे. त्यासाठी पुढच्या वर्षी एका जागतिक परिषदेचे आयोजन करणार असल्याचेही गुटेरेस यांनी म्हटले आहे.