Coronavirus In India: भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएंटवर WHO द्वारा अद्याप कोणताच निर्णय नाही
ही स्थिती वाढण्यात भारतात आढळलेला नवा कोरोना व्हेरीएंट (Covid 19 Variants In India) किती कारणीभूत आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आली नाही.
भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरस व्हेरियंटवरुन (Covid 19 Variants) जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. काही लोकांनी हा व्हेरियंट अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. परंतू, जागतिक आरोग्य संघटनकडून (WHO) मात्र या व्हेरिएंटबाबत अत्याप कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. डब्ल्युएचओच्या (WHO) एका प्रवक्त्याने म्हटले की, भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. ही स्थिती वाढण्यात भारतात आढळलेला नवा कोरोना व्हेरीएंट (Covid 19 Variants In India) किती कारणीभूत आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आली नाही.
डब्ल्युएचओ प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या सख्येत वाढ होण्यासाठी अनेग गोष्टी कारणीभूत आहेत. जसे की, सण, उत्सव, निवडणूका अशा अनेक कारणांमुळे भारतातील नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्र येताना दिसत होते. इंग्लंडमध्ये आढळले आहे की, भारतात उत्पन्न झालेली स्थिती जगभरात प्रभाव टाकू शकते. भारतात सोमवारी 350,000 पेक्षा अधिक नागरिकांना कोरोना संक्रमण झाल्याचे आढळून आले आहेत. इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि ब्राझील आदी देशांमध्ये आढळलेल्या कोरोना व्हेरिएंट्सला WHO कडून चिंताजनक घोषीत करण्यात आला आहे. (हेही वाचा, देशातील Coronavirus स्थितीबाबत Greta Thunberg ने व्यक्त केले दुःख; जागतिक समुदायाला भारताची मदत करण्याचे आवाहन)
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा नवा व्हेरीएंट वेगाने पसरण्याची क्षमता ठेवतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे हेच मोठे आव्हान समजले जात आहे. कोरोनाच्या संक्रमनाचा प्रभाव हा प्रतिकार शक्तीवर पडतो. ज्यामुळे मानवाची रोगाविरोधात लढण्याची शक्ती कमी होते. डब्युएचओचे प्रमुख ड्रेडोस एडहोम घेब्येयियस यांनी सोमवारी जिनिव्हा येथे म्हटले की, काही ठिकाणी कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढण्याचा क्रम हा गेली नऊ महिने कायम आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना संक्रमितांच्या संख्येतही मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.