Coronavirus Outbreak: फ्रांसमधील Health Emergency 24 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय

अशात अमेरिका, इटली, स्पेन, युके, फ्रांस (France) यांसारख्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहेत

Coronavirus (Photo Credits: Getty Images)

सध्या जगातील अनेक देश कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाचा सामना करीत आहेत. अशात अमेरिका, इटली, स्पेन, युके, फ्रांस (France) यांसारख्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहेत. फ्रांसमध्ये कोरोना बाधितांची संख्या दीड लाखाच्या वर गेली आहे, तर 24 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात फ्रांसमध्ये आरोग्य आणीबाणी (Health Emergency) 24 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे आरोग्य मंत्री आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी याबाबत माहिती दिली.

24 मार्च रोजी फ्रांसमध्ये आणीबाणी सुरु झाली होती, मात्र ती आता हटवल्यास या विषाणूचा प्रसार आणि उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे देशात 24 जुलैपर्यंत ही आरोग्य आणीबाणी तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमाबरी संसदेसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. परदेशातून फ्रान्समध्ये येणा-या लोकांना वेगळे ठेवण्याच्या काही अटी देखील या विधेयकात नमूद केल्या गेल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री क्रिस्तोफ कास्टनर (Christophe Castaner) म्हणाले की. ‘आम्हाला एकून काही वेळ या विषाणूसोबत राहावे लागणार आहे मात्र धोका अजून कमी झाला नाही. या सादर होणाऱ्या प्रस्तावामध्ये कोरोना विषाणूग्रस्त लोक आणि याबाबत काम करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी ‘माहिती प्रणाली’ समाविष्ट आहे, जी एक वर्षापर्यंत कार्यरत असेल.’ (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी Remdesivir च्या वापरास FDA ची मान्यता; या औषधाने रुग्ण लवकर बरे होत असल्याचा दावा)

दरम्यान, फ्रान्स हा एक अशा युरोपियन देशांपैकी एक आहे, जिथे कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. सध्या फ्रांसमध्ये 167,346 संक्रमित रुग्णांची पुष्टी झाली असून, 24,594 मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच सरकारने 11 मेपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याचा विचार केला आहे, ज्यामध्ये प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यासह इतर गोष्टींचा समावेश असेल.