Coronavirus: कोरोना संसर्गावर Chewing Gum ठरणार प्रभावी; 95% परिणामकारक असल्याचा दावा
आतापर्यंत तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपया असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता च्युईंग गम (Chewing Gum) हा सुद्धा कोरोना व्हायरस अर्थातच कोविड-19 (COVID-19) संसर्ग रोखू शकतो असा दावा केला जातो आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपया असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता च्युईंग गम (Chewing Gum) हा सुद्धा कोरोना व्हायरस अर्थातच कोविड-19 (COVID-19) संसर्ग रोखू शकतो असा दावा केला जातो आहे. विशिष्ट पद्धतीने बनविण्यात आलेला च्युईंग गम तोंडामधील करोना पार्टीकल्सचा ट्रॅप करतो आणि हा च्युईंग गम 95% प्रभावी ठरतो असा दावाही वैज्ञानिकांनी केला आहे.
वैज्ञानिकांनी दावा करताना म्हटले आहे की, विशिष्ट पद्धतीने बनविलेले हे च्युईंग गम हे एखाद्या जाळीप्रमाणे काम करते. ज्या पद्धतीने जाळी टाकून एखादा प्राणी, वस्तू, कीटक पकडला जातो त्याच पद्धतीने च्युईंग गम कोरोना पार्टीकल्स पकडतो. प्रामुख्याने च्युईंग गम खाताना तोंडात निर्माण होणारी थुंकी कोरोना पार्टिकल्स नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कोरोना पार्टीकल्स जर नियंत्रणात राहिले तर कोरोना होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. प्रामुख्याने कोरोना संक्रमित व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या तोंडातून ड्रॉपलेट्स (हवेच्या माध्यमातून प्रसार होऊ शकतील असे तोंडातील, नाकातील द्रव्याचे छोटे थेंब) हवेत पसरतात. या ड्रॉपलेट्सच्या माध्यातून होणारा कोरोना रोखण्यास हा च्युईंग गम फायदेशीर ठरतो, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. (हेही वाचा, Maharashtra Covid-19 Relief Application: कोरोनाकाळातील मृतांच्या कुटुंबीयास 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य, महाराष्ट्र सरकारचा निर्णय; कुठे कराल अर्ज?)
च्युईंग गमबाबत केले जाणारे दावे
- हा च्युईंग गम विशिष्ट पद्धतीचा
- च्युईंग गममध्ये एसीईटू प्रोटीनचे घटक
- हे प्रोटीन्स शरीरांच्या पेशीच्या पृष्ठभागावर आढळतात
- कोरोना विशाणू पेशींना संसर्ग करताना हा च्युईंगम पेशींचे करतो संरक्षण
- कोरोनाशी संबंधित घटक च्युईंग गमशी चिकटतात
- च्युईंग गम 95% प्रभावी असल्याचा दावा
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पेनसिल्व्हेनिया विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने या च्युईंग गमची निर्मिती केली आहे. हा च्युईंग गम सर्वसामान्य च्युईंग गम प्रमाणेच आहे. मॉलिक्युलर थेरपीच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. हा च्युईंग गम सर्वसामान्य तापमानाला ठेवता येतो. सामान्य तापमानाचा एसीईटू प्रोटीन मॉलिक्युल्सवर (जो च्युईंग गममध्ये आहे) काहीही विशेष परिणाम होत नाही.