जगभरात कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 7 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू तर 2 कोटीहून अधिक लोकांना COVID-19 ची लागण
याचाच अर्थ जगातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत भारत तिस-या स्थानी आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत 2,28,60,184 रुग्णांना COVID-19 ची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 7,97,105 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण जगभरातून आतापर्यंत 1,55,15,681 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला जगात 65,47,398 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत (USA) असून त्यापाठोपाठ ब्राझील (Brazil), भारत (India), रशियामध्ये (Russia) सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. याचाच अर्थ जगातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत भारत तिस-या स्थानी आहे.
हेदेखील वाचा- COVID19 Tests In Single Day: भारताने कोविड 19 च्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज नवीन उच्चांक; एकाचं दिवसात 9,18,470 चाचण्या
अमेरिकेत कोरोनाचे 57 लाख 46 हजार 272 रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण 1,77,424 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर तिस-या स्थानी असलेल्या भारत देशात मागील 24 तासांत 68,898 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,05,824 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 983 रुग्ण दगावले असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 54,849 वर पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे. सद्य घडीला भारतात 6,92,028 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
कोविड-19 (Covid-19) विरुद्धच्या लढाईमध्ये जगातील सर्वात पहिली लस Sputnik V च्या पहिल्या बॅचचे उत्पादन करण्यात आले आहे, अशी माहिती रशियाच्या (Russia) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरस वरील Sputnik V या लसीचे 2 वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत. पहिले इंजेक्शन घेतल्यानंतर 3 आठवड्यांनी दुसरे इंजेक्शन घ्यावे लागते. ही दोन्ही इंजेक्शन्स घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी वाढते.