Coronavirus Update : न्यूयॉर्क येथे कोरोना विषाणूमुळे आणखी 599 लोकांचा मृत्यू
कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 69 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. मात्र, चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 69 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. मात्र, चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना विषाणूने सध्या अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. न्यूयार्क (New York) आणखी 500हून लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे न्यूयार्कमध्ये 500 नागरिकांचा बळी गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण होऊन अमेरिकेत आतापर्यंत 4 हजार 159 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 22 हजार लोकांना याची लागण झाली आहे.
चीनमध्ये चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणून संपूर्ण जगाचे लक्ष्य केंद्रीत करून घेतले आहेत. डिसेंबर महिन्याच्या 8 तारखेला कोरोना विषाणूचे पहिला रुग्ण चीन येथील वुहान येथे आढळला होता. त्यानंतर हा विषाणू संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी 170 हून अधिक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या चीनने कोरोनाबाधित लोकांच्या संख्येवर नियंत्रण मिळवले असल्याचे समजत आहेत. मात्र, इराण, स्पेन, इटली या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच न्यूयार्कमध्ये आणखी 599 नवे रुग्ण आढळल्याने अमेरिकेत 29 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: आता वाघालाही कोरोना व्हायरस बाधा, चाचणी पॉझिटीव्ह; न्यूयॉर्क शहरातील प्राणिसंग्रहालयातील घटना
ट्वीट-
कोरोना विषाणूने गेल्या काही महिन्यातच संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात एकूण 69 हजार 419 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लाख 73 हजार 794 लोकांना याची लागण झाली आहे. याशिवाय 2 लाख 60 हजार 193 लोक बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.