Coronavirus: New York येथे 10,482 नव्या रुग्णांची नोंद, 562 जाणांचा 1 दिवसात मृत्यू; COVID-19 बाधितांची एकूण संख्या 102,863, आतापर्यंत 2,935 बळी
तर कोरनाचा बळी ठरलेल्यांची संख्या 2,935 इतकी आहे. न्यू यॉर्कमध्ये आज दिवसभरात 10,482 रुग्णांची नोंद झाली. तर 562 जाणांचा मृत्यू झाला. अल्बानियाच्या गव्हर्नर अँड्र्यू कोमु (Andrew Cuomo ) यांनी कोरोना व्हायरस परिस्थितीचा दैनंदिन तपशील ही माहिती दिली.
जगभरात कोरोना व्हायरस काळ बनून राहिला आहे. इतका की, जगभरातील प्रगत राष्ट्रंही हताश होऊ या संकटाकडे पाहात असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला इटली आणि त्यानंतर आता अमेरिका. न्यूयॉर्क येथे तर कोरना व्हायरस आग ओकतोय अशी स्थिती आहे. ताज्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्क शहरात कोरना व्हायरस बाधितांची संख्या 102,863 इतकी आहे. तर कोरनाचा बळी ठरलेल्यांची संख्या 2,935 इतकी आहे. न्यू यॉर्कमध्ये आज दिवसभरात 10,482 रुग्णांची नोंद झाली. तर 562 जाणांचा मृत्यू झाला. अल्बानियाच्या गव्हर्नर अँड्र्यू कोमु (Andrew Cuomo ) यांनी कोरोना व्हायरस परिस्थितीचा दैनंदिन तपशील ही माहिती दिली.
अँड्र्यू कोमु यांनी पुढे बोलताना सांगितले की, न्यूयॉर्क शहरातील लॉन्ग आईसलँड प्रदेशात कोरोना व्हायरस संसर्गाचे अधिक रुग्ण आहेत. प्रत्येक तासाला त्यात भरच पडत आहे. प्रशासनासमोर ही चिंतेची बाब आहे. महत्त्वाचे असे की, कोमू यांनी ज्या प्रदेशाचा उल्लेख केला त्या प्रदेशात आरोग्य यंत्रणा तितकीशी विस्तृत आणि प्रभावी नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना या गोष्टीचाही तेथील प्रशासनाला मोठा विचार करावा लागणार आहे.
ट्विट
पुढे बोलताना अँड्यू कोमु यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेकब जॅविट्स सेंटर (Jacob Javits Center) येथे मोबाईल हॉप्सिटलचे रूपांतर सर्वासाधारण रुग्णांऐवजी (नॉन-कोरोनाव्हायरस) कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, FEMA हे ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत फार उत्साही दिसला नाही, असी टीपण्णीही कोमु यांनी या वेळी जोडली. (हेही वाचा, Coronavirus: एक महिन्यासाठी सिंगापूर लॉकडाऊन; पंतप्रधान हसेन लूंग यांची घोषणा)
कोमु पुढे बोलताना म्हणाले, कोविड 19 रुग्णांवर उपचार करत नसलेली इतर रुग्णालंय तशी पाहात फारशी कार्यरत नाहीत. कारण घराबाहेर पडणारे लोक कमी आहेत. त्यांची वाहन रस्त्यांवर पार्क करण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणजे शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे. तसेच, कोविड 19 वगळता इतर रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे.