Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1.06 कोटी; 515,000 पेक्षा अधिक मृत्यू
जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (43,991), इटली (34,788), फ्रान्स (29,864), मॅक्सिको (28,510), स्पेन (28,364), भारत (17,400) आणि ईरान (10958) या देशांचा समावेश आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट येणार असल्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळवरुन व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच इतका हाहाकार माजला आहे तर दुसऱ्या लाटेत काही होईल, असाही भीतीयुक्त सवाल विचारला जात आहे. दरम्यान सध्यास्थितीत कोरोना व्हायरस संक्रमन झालेल्या रुग्णांची जगभरातील संख्या चक्रावून टाकणारी आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारी जाहीर करते. त्यानुसार गुरुवारी (2 जुलै 2020) सकाळपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10,667,217 तर कोरोना व्हायरस संक्रमित मृतांची संख्या 515,542 इतकी आहे.
कोरोना व्हायरस संक्रमनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा क्रमांक सर्वात पहिला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची सध्यास्थितीतील संख्या 2,685,806 इतकी तर मृतांची संख्या 128,061 इतकी आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,448,753 तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 60,632 इतकी आहे. ( गेल्या 21 तासात कोरोना रुग्णांची जगभराती आकडेवारी कितीने वाढली पाहा)
कोरोना व्हायरस रुग्णसंख्येत अव्वल असलेल्या देशांची आकडेवारी
अमेरिका- 2,685,806
ब्राझिल- 1,448,753
रशिया- 653,479
भारत-585,493
इंग्लंड- 314,992
पेरू- 288,477
चिली- 282,043
स्पेन - 249,659
इटली- 240,760
मॅक्सिको- 231,770
ईरान- 230,2111
पाकिस्तान- 213,470
फ्रान्स- 202,981
तुर्की- 201,098
जर्मनी- 195,893
सऊदी अरब- 194,225
दक्षिण अफ्रीका- 159,333
बांग्लादेश- 149,258
कॅनाडा- 106,288
जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (43,991), इटली (34,788), फ्रान्स (29,864), मॅक्सिको (28,510), स्पेन (28,364), भारत (17,400) आणि ईरान (10958) या देशांचा समावेश आहे.