Coronavirus Impact: कोरोना व्हायरसमुळे चीनमधील प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट; NASA ने प्रसिद्ध केले सॅटेलाईट फोटो

नासा (NASA) आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या (European Space Agency) प्रदूषण नियंत्रण उपग्रहांमध्ये, चीनमधील वायू प्रदूषणाच्या पातळीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या पंधरवड्यात चीनच्या कार्बन उत्सर्जनात किमान 10 दशलक्ष मेट्रिक टन घसरण झाल्याचे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका स्वतंत्र अभ्यासानुसार दिसून आले आहे

NASA satellite Image. (Photo Credits: NASA)

चीनमध्ये (China) कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) आतापर्यंत 3000 पेक्षा लोकांचा बळी गेला आहे. या व्हायरसची पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या वाढून 75,000 झाली आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या या विषाणूने चीनच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान, त्यातल्या त्यात चांगली बातमी अशी आहे की, चीनमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे (Pollution Level) प्रमाण जानेवारीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे.

नासा (NASA) आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या (European Space Agency) प्रदूषण नियंत्रण उपग्रहांमध्ये, चीनमधील वायू प्रदूषणाच्या पातळीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या पंधरवड्यात चीनच्या कार्बन उत्सर्जनात किमान 10 दशलक्ष मेट्रिक टन घसरण झाल्याचे, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका स्वतंत्र अभ्यासानुसार दिसून आले आहे - गेल्या वर्षी याच कालावधीत जागतिक स्तरावरील उत्सर्जनाच्या हे जवळजवळ सहा टक्के आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने, देशातील कारखाने बंद पडले आणि रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत मोठी कपात झाल्याचे समजते. यामुळेच प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोना विषाणूचा चीनच्या उद्योग आणि ट्रॅव्हल सिस्टमवर खूप वाईट परिणाम झाला आहे. यापूर्वीच्या नासाच्या छायाचित्रांमधे चीनमध्ये गेल्या महिन्यात नायट्रोजन डाय ऑक्साईडची पातळी कमी असल्याचे दिसून आले होते, जे व्हायरसमुळे झालेल्या आर्थिक मंदीमुळे होते. यूएस स्पेस एजन्सीने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झालेल्या आर्थिक मंदीमुळे ही घसरण झाल्याचे पुरावे आहेत.' (हेही वाचा: Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण)

नासाच्या पृथ्वी वेधशाळेने म्हटले आहे की, नुकत्याच नोंदविण्यात आलेल्या घटमुळे लुनार न्यू इयरदेखील होऊ शकते. मात्र, संशोधकांचे मत आहे की प्रदूषणात झालेली घट ही हवामानाशी संबंधित नाही.  2008 च्या ऑलिम्पिकमध्ये बीजिंगच्या आसपास प्रदूषणात मोठी घट नोंदवली होती, असे नासाने सांगितले. परंतु त्याचा परिणाम बहुधा स्थानिक क्षेत्रात झाला होता आणि ऑलिम्पिक संपल्यानंतर प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढली. तसेच 2008 मध्ये झालेल्या आर्थिक मंदीच्या काळातही अनेक देशांत नायट्रोजन डाय ऑक्साईडची कमी झालेली पातळी दिसून आली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement