Hershey च्या चॉकलेट मध्ये Lead, Cadmium सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक; धातूंचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला

Food and Drug Administration ने nonprofit संस्थेला सांगितले की तज्ञ चॉकलेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिसे आणि कॅडमियमसाठी "minor source of exposure" मानतात, परंतु उत्पादक आणि प्रोसेसर त्यांच्या अन्नाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात.

Hershey | Twitter

Hershey (HSY.N) च्या चॉकलेट मध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक शिसं (lead)आणि कॅडियम (cadmium)आढळून आल्याचं Consumer Reports मध्ये सांगण्यात आले आहे. सध्या Hershey ला त्यांच्या चॉकलेट्स मधून या दोन्ही धातूंचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

नॉन प्रॉफिट कंज्युमर ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांकडील 48 उत्पादनांपैकी 16 उत्पादनांमध्ये त्याच्या शास्त्रज्ञांनी चाचणी केली असता त्यात शिसे, कॅडमियम किंवा दोन्ही संभाव्य धोकादायक पातळीत आढळले आहेत. Consumer Reports ने 7 वेगवेगळ्या कॅटेगरीमधील चॉकलेट्स तपासले आहेत. त्यामध्ये डार्क चॉकलेट बार, मिल्क चॉकलेट बार, कोको पावडर, चॉकलेट चिप्स आणि ब्रॉऊनिससाठीचे मिक्सेस, चॉकलेट केक आणि हॉट चॉकलेट यांचा समावेश आहे.

Walmart (WMT.N)च्या डार्क चॉकलेट बार, हॉट चॉकलेट मिक्स, Hershey's and Droste च्या कोको पावडर, Target (TGT.N) च्या सेमी स्वीट चॉकलेट चिप्स, Trader Joe's,Nestle (NESN.S) आणि Starbucks (SBUX.O) च्या हॉट चॉकलेट मिक्स मध्ये हे अधिक प्रमाणात धातूंचा समावेश आहे.

फक्त मिल्क चॉकलेट बार, ज्यामध्ये कमी कोको सॉलिड्स असतात, त्यात जास्त प्रमाणात धातू नसल्याचं आढळून आलं आहे. पण गरोदर महिला, लहान मुलांनी अशाप्रकारची चॉकलेट्स अधिक प्रमाणात खाल्ल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते, किडनीचे नुकसान होऊ शकते.

U.S. Food and Drug Administration ने nonprofit संस्थेला सांगितले की तज्ञ चॉकलेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिसे आणि कॅडमियमसाठी "minor source of exposure" मानतात, परंतु उत्पादक आणि प्रोसेसर त्यांच्या अन्नाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. Health Tips: डार्क की सफेद, जाणून घ्या कोणते चॉकलेट आरोग्यासाठी ठरते फायदेशीर .

मार्चमध्ये, Hershey Chief Financial Officer Steve Voskuil म्हणाले की त्यांची कंपनी शिसे आणि कॅडमियमची पातळी कमी करण्याचा विचार करत आहे, ते म्हणाले की धातू हे मातीतील घटक आहेत जे चॉकलेट उत्पादनात नैसर्गिकरित्या येऊ शकतात.