Coloured Tattoos Ban in EU: युरोपियन देशांमध्ये रंगीत टॅटूवर उद्यापासून येऊ शकते बंदी; कलाकार नाराज, जाणून घ्या कारण

रीचने सांगितले आहे की, त्यांचा उद्देश टॅटूवर बंदी घालण्याचा नसून, टॅटूमध्ये वापरण्यात येणारे रंग आणि मेकअप सुरक्षित करणे हा आहे. या निर्णयानंतर टॅटू कलाकार चांगलेच नाराज झाले आहेत. यामुळे त्यांचा रोजगार धोक्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे

Tattoo (Photo Credits: Pixabay)

जगभरातील अनेक लोक त्यांच्या शरीरावर विविध प्रकारचे, चित्र-विचित्र टॅटू (Tattoo) काढून घेत असतात. यामध्ये साध्या टॅटूपासून अगदी रंगीत टॅटूचाही समावेश असतो. परंतु आता युरोपियन युनियनमध्ये (European Union) लोकांना टॅटूची क्रेझ पूर्वीसारखी दिसणार नाही. याठिकाणी, 4 जानेवारीपासून टॅटू त्यांचे रंग आणि चमक दोन्ही गमावतील. जानेवारी 2020 मध्ये, युरोपियन युनियन फॉर रजिस्ट्रेशन, इव्हॅल्यूएशन, ऑथोरायझेशन अँड रिस्ट्रिक्शन ऑफ केमिकल्स (REACH) ने टॅटूच्या रंगीत शाईमध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्‍या सुमारे 4000 रसायनांवर बंदी घातली होती.

नियामक संस्थेने पुरवठादारांना अशा रसायनांच्या ऐवजी तत्सम रंगीत रसायने शोधण्‍यास सांगितले होते. इतर पर्यायांचा शोध घेण्यासाठी शाईच्या पुरवठादारांना 4 जानेवारी 2021 पर्यंत वेळ दिला आहे. संस्थेने फक्त रीचने मंजूर केलेल्या रसायनांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत, 4 जानेवारीपासून, युरोपियन युनियनमधील टॅटू कलाकार रंगीत शाई (REACH Banned Colored Ink) वापरू शकणार नाहीत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, अशा काही रसायनांवर आधीच बंदी आहे, कारण त्यांच्यामुळे 'कर्करोग किंवा जनुकीय उत्परिवर्तन'चा धोका राहतो.

रीचने सांगितले आहे की, त्यांचा उद्देश टॅटूवर बंदी घालण्याचा नसून, टॅटूमध्ये वापरण्यात येणारे रंग आणि मेकअप सुरक्षित करणे हा आहे. या निर्णयानंतर टॅटू कलाकार चांगलेच नाराज झाले आहेत. यामुळे त्यांचा रोजगार धोक्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुरवठादारही काही ठोस पावले उचलत नसल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत लोकांना रंगीबेरंगी टॅटू बनवणे कठीण झाले आहे. रसायनावरील निर्बंधांमुळे पिगमेंट ब्लू 15:3 आणि पिगमेंट ग्रीन 7 रंग मिळणे अवघड होईल. (हेही वाचा: कोरोनानंतर इस्रायलमध्ये आढळला Florona नावाचा आजार; दोन व्हायरसचा संसर्ग, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, ‘सेव्ह द पिगमेंट्स’ नावाच्या याचिकेवर 175,000 हून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे. फक्त या वरील दोन रंगद्रव्यांसाठी पर्याय शोधण्यासाठी रीचने शाई पुरवठादारांना 4 जानेवारी 2023 पर्यंत मुदत दिली आहे. परंतु टॅटूंमधून कर्करोगाच्या संभाव्य धोक्याचा खात्रीशीर पुरावा शोधणे कठीण आहे आणि शाईवरील बंदीमुळे व्यवसायाचे नुकसान होऊ शकते अशी तक्रार युरोपियन टॅटू कलाकारांनी तक्रार केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement