China: 24 तासात 6 कॉस्मेटिक शस्त्रक्रिया... महिलेचा मृत्यू; कुटुंबाचा क्लिनिकवर 1.5 कोटींचा दावा

चीनमध्ये एका महिलेने 24 तासांत सहा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्याने तिचा दुःखद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

China: चीनमध्ये एका महिलेने 24 तासांत सहा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्याने तिचा दुःखद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नॅनिंग क्लिनिकमध्ये त्या महिलेने या श्स्त्रक्रिया केल्या होत्या. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबाने क्लिनिकवर 1.5 कोटींचा दावा ठेकला आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी गुआंग्शी प्रांतातील गुईगांग येथीलही महिला क्लिनिकमध्ये अनेक कॉस्मेटिक श्सत्रक्रिया करण्यासाठी गेली होती. खर्च भागवण्यासाठी, लिऊने 40,000 युआनपेक्षा जास्त कर्ज घेतले होते. लियू असे मृत महिलेचे नाव आहे.(Israel Attack Lebanon: उत्तर बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ले; 20 जण ठार, 6 जखमी)

मायन्यूजच्या वृत्तानुसार, 9 डिसेंबरच्या दुपारी, लियूने पापणी आणि नाकाची दुहेरी शस्त्रक्रिया सुरू केली, ही प्रक्रिया पाच तास चालली. ज्यात तिच्या पायांवर लिपोसक्शन केले. त्यानंतर काढलेली चरबी दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या चेहऱ्यावर आणि स्तनांवर विविध ठिकाणी लावली. या प्रक्रियेला पाच तास लागले. तथापि, 11 डिसेंबर रोजी, डिस्चार्ज झाल्यानंतर आणि क्लिनिकच्या लिफ्टजवळ येत असताना, लिऊ अनपेक्षितपणे कोसळली.

क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी तिला शुद्धीवर आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले. लिऊला दुसऱ्या नॅनिंग पीपल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनाने तिच्या मृत्यूचे कारण "लायपोसक्शन नंतर पल्मोनरी एम्बोलिझम"ने झाल्याचे सांगण्यात आले.

लिऊच्या कुटुंबाने नानिंग शहरातील जिआंगनान जिल्हा पीपल्स कोर्टात खटला दाखल केला आणि नुकसानभरपाई म्हणून 1.18 दशलक्ष युआन (US$168,000) ची मागणी केली. तिच्या पतीने नोंदवले की त्याला क्लिनिकने 200,000 युआन देऊ केले होते. मात्र, जीव गमावल्यामुळे किमान एक दशलक्ष युआनची भरपाई द्यावी अशी मागणी केली.

कायदेशीर कारवाईदरम्यान, क्लिनिकने असा युक्तिवाद केला की शस्त्रक्रियेतील जोखीम समजून घेण्यासाठी लिऊ जबाबदार आहे. त्याशिवाय क्लिनिककडून गैरवर्तनीक करण्यात आली नव्हती. सुरुवातीला, न्यायालयाने क्लिनिकला पूर्णपणे जबाबदार धरले आणि 1 दशलक्ष युआन भरपाईचे आदेश दिले. तथापि, अपीलानंतर, न्यायालयाने सामायिक दायित्व स्वीकारून नुकसानभरपाई 590,000 युआन इतकी कमी केली. कोर्टाने क्लिनिकच्या वैद्यकीय पद्धतींमधील त्रुटींचा उल्लेख केला. कोर्टाकडून सांगण्यात आले की, शस्त्रक्रियेमुळे महिलेच्या शिरादबल्या गेल्या. ज्यामुळे तिला श्वास घेता आला नाही. बिघडलेल्या परिस्थीतीमुळे तिचा मृत्यू झाला.