COVID-19 Nasal Spray Vaccine: चीन ने जगातील पहिल्या कोरोना नेजल स्प्रे वॅक्सिन च्या ट्रायलसाठी दिली परवानगी
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी चीन आता वेदनादायी इंजेक्शन ऐवजी नेजल स्प्रे व्हॅक्सिनचा (Nasal Spray Vaccine) पर्याय आजमावून पाहत आहे

कोरोना व्हायरसचं थैमान रोखण्यासाठी जगभरातील संशोधक सध्या लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. अशामध्ये चीन आता वेदनादायी इंजेक्शन ऐवजी नेजल स्प्रे व्हॅक्सिनचा (Nasal Spray Vaccine) पर्याय आजमावून पाहत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. Xiamen University आणि Hong Kong University सोबतच Beijing Wantai Biological Pharmacy Enterprise Co च्या मदतीने ती तयार करण्यात आली आहे. China Coronavirus Vaccine: चीनने जगाला दाखवली आपल्या पहिल्या कोरोना व्हायरस लसीची झलक; जाणून घ्या या लसीच्या चाचणीचे तपशील.
लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये Intranasal spray चा वापर यापूर्वी फ्लू मध्ये करण्यात आला होता. आता इंजेक्शनच्या वेदना टाळण्यासाठी पुन्हा हा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान हा प्रमुख लसींमधील उपचार नाही. पर्यायी उपचार पद्धती म्हणून संशोधक याकडे बघत आहेत. दरम्यान नेजल स्प्रे वॅक्सिनच्या पहिल्या टप्प्याला नोव्हेंबर 2020 पासून सुरूवात होऊ शकते. यामध्ये 100 जण सहभागी होणार आहेत. चीन मधील सरकारी ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार, ही केवळ एकमेव लस आहे ज्याला चीनच्या राष्ट्रीय चिकित्सा उत्पाद प्रशासन कडून मंजुरी देण्यात आली आहे. ColdZyme माऊथ स्प्रे च्या मदतीने 20 मिनिटांत 98% COVID-19 चे वायरस निष्क्रिय होतात: Enzymatica स्वीडीश कंपनीचा दावा.
दरम्यान संशोधकांच्या दाव्यानुसार, नेजल स्प्रेच्या माध्यमातून लसीकरण करणार्यांमध्ये इन्फ्लुएंजा आणि नोवेल कोरोना वायरस या दोन्हींमधून सुरक्षा मिळू शकते. युएन ने दिलेल्या माहितीनुसार, या नेजल स्प्रे वॅक्सिनच्या क्लिनिकल परीक्षणाला पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या अहवाल हाती येण्यासाठी किमान 1 साल किंवा त्या पेक्षाही अधिक काळ लागू शकतो.
जगभरात सध्या विविध देशांत कोरोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये लस शोधली जात आहे. सध्या त्यांच्या लसी या इंजेक्शनच्या स्वरूपात असून मानवी चाचणीच्या अंंतिम टप्प्यामध्ये आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सोबत अॅस्ट्राझेनिका कंपनी बनवत असलेली लस अंटिम टप्प्यात आहे. मात्र त्याचे परिणाम प्रतिकूल आल्याने मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)