China Tick-Borne Virus: चीनमध्ये कोरोना विषाणू पाठोपाठ नव्या विषाणूचे थैमान; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 60 जणांना संसर्ग
त्यानंतर आता कुठे चीन पुन्हा मार्गावर येत असताना आता एका नव्या समस्येने चीनच्या उंबरठ्यावर पाय ठेवला आहे. चीनमध्ये एका नवीन संसर्गजन्य आजाराने (Tick-Borne Virus) 7 लोकांचा मृत्यू आणि 60 पेक्षा जास्त लोकांना संक्रमित केले आहे.
चीन (China) च्या वूहान प्रांतातून कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लोन संपूर्ण जगात पसरले. त्यानंतर आता कुठे चीन पुन्हा मार्गावर येत असताना आता एका नव्या समस्येने चीनच्या उंबरठ्यावर पाय ठेवला आहे. चीनमध्ये एका नवीन संसर्गजन्य आजाराने (Tick-Borne Virus) 7 लोकांचा मृत्यू आणि 60 पेक्षा जास्त लोकांना संक्रमित केले आहे. चिनी सरकारी माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. यासोबतच मानवांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला. पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतात (Jiangsu Province) 37 हून अधिक लोकांना एसएफटीएस विषाणूची (SFTS Virus) लागण झाली आहे.
अधिकृत ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, पूर्वी चीनच्या अनहुई प्रांतात (Anhui province) नंतर 23 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले. या विषाणूची लागण झालेल्या जिआंग्सुची राजधानी नानजियांग येथील एका महिलेला सुरुवातीला खोकला आणि ताप येण्याची लक्षणे दिसली. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये तिच्या शरीरात ल्युकोसाइट (Leukocyte) आणि प्लेटलेट कमी झाल्याचे त्यांना आढळले. महिनाभर उपचारानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. अनहुई आणि पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात या विषाणूमुळे कमीतकमी सात जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
एसएफटीएस व्हायरस हा नवीन नाही. याचा शोध चीनमध्ये 2011 मध्ये लागला होता. विषाणूशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा संसर्ग प्राण्यांच्या शरीरावर असलेया टिक (Ticks) सारख्या कीटकांद्वारे पसरतो आणि नंतर तो मानवांमध्ये आढळून येतो. झेजियांग विद्यापीठांतर्गत प्रथम संलग्न रुग्णालयातील डॉक्टर शेंग जिफांग (Sheng Jifang) म्हणाले की, या विषाणूची मानव ते मानव संक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही. हा विषाणू संक्रमित रूग्ण रक्त किंवा श्लेष्मा द्वारे इतरांकडे ते विषाणू पाठवू शकतो. मात्र याबाबत काळजी घेतल्यास धोका कमी होऊ शकतो असेही डॉक्टर्स म्हणाले.